Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ!

कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ!

चालू आर्थिक वर्ष खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी समाधानकारक असेल. कर्मचाºयांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 06:18 AM2018-08-18T06:18:45+5:302018-08-18T06:19:14+5:30

चालू आर्थिक वर्ष खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी समाधानकारक असेल. कर्मचाºयांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Employees earn an average 10 percent salary increase! | कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ!

कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ!

मुंबई  -  चालू आर्थिक वर्ष खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी समाधानकारक असेल. कर्मचाºयांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी ही पगारवाढ १५ टक्क्यांपर्यंत असेल, तर औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाºयांना मात्र कमी पगारवाढीचे संकेत आहेत.
रोजगार क्षेत्रासंदर्भात सर्वेक्षण करणाºया ‘टीमलीझ सर्व्हिसेस’ने २०१७-१८ या आर्थिक वर्षातील पगारवाढीचा अभ्यास केला. त्याआधारे त्यांनी २०१८-१९ आर्थिक वर्ष कर्मचाºयांसाठी कसे असेल, याचा अंदाज बांधला आहे. या अभ्यासानुसार, डिजिटायझेशनमुळे सध्या वित्त तंत्रज्ञान व ई-कॉमर्स क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. एकूण १७ पैकी ९ क्षेत्रांतील कर्मचाºयांना दमदार पगारवाढीची शक्यता आहे. त्यात स्टार्ट अप्स, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणाºया व तयार खाद्यपदार्थांची निर्मिती करणाºया कंपन्या, फार्मा, आयटी, मीडिया व मनोरंजन, किरकोळ तसेच टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांमधील कर्मचाºयांना १२ ते १५.३७ टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत.

यांचे ‘अच्छे दिन’

सर्वाधिक १५.३७ टक्के पगारवाढीमध्ये आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूतील ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाºयांचा समावेश आहे. या क्षेत्रातील कर्मचाºयांना १४.५५ टक्के पगारवाढीचा अंदाज आहे.

Web Title: Employees earn an average 10 percent salary increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.