Lokmat Money > बिझनेस न्यूज > दार्जिलिंग बंदमुळे कैक लाख किलो चहा वाया, हंगाम गमावला; मळ्यांना आता कामगारांची प्रतीक्षा

दार्जिलिंग बंदमुळे कैक लाख किलो चहा वाया, हंगाम गमावला; मळ्यांना आता कामगारांची प्रतीक्षा

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या प्रदीर्घ दार्जिलिंग बंद आंदोलनामुळे दार्जिलिंग पर्वतराजीतील अभिजात चहाच्या मळ्यांनी एक अख्खा हंगाम गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:29 AM2017-09-21T01:29:50+5:302017-09-21T01:29:52+5:30

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या प्रदीर्घ दार्जिलिंग बंद आंदोलनामुळे दार्जिलिंग पर्वतराजीतील अभिजात चहाच्या मळ्यांनी एक अख्खा हंगाम गमावला

Due to the shutdown of Darjeeling, the loss of lakh crores of tea was lost; Now the laborers wait for the workers | दार्जिलिंग बंदमुळे कैक लाख किलो चहा वाया, हंगाम गमावला; मळ्यांना आता कामगारांची प्रतीक्षा

दार्जिलिंग बंदमुळे कैक लाख किलो चहा वाया, हंगाम गमावला; मळ्यांना आता कामगारांची प्रतीक्षा


कोलकाता : स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या प्रदीर्घ दार्जिलिंग बंद आंदोलनामुळे दार्जिलिंग पर्वतराजीतील अभिजात चहाच्या मळ्यांनी एक अख्खा हंगाम गमावला असून, आता कामगारांची परत येण्याची प्रतीक्षा ते करीत आहेत. चहाच्या मळ्यांतील कामे सुरू करण्यास मालक उत्सुक आहेत.
लक्ष्मी टी कंपनीचे संचालक रुद्र चटर्जी यांनी सांगितले की, दार्जिलिंग बंदच्या काळात आम्ही आमचे मळे कधीच बंद केले नव्हते. जूनमध्ये आंदोलन सुरू झाले तेव्हापासून आमची सर्व व्यवस्थापन टीम मकाईबारी टी इस्टेटमध्ये तैनात आहे. आता कामगारांच्या परतण्याची, तसेच मळ्यातील कामे सुरू होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे.
चटर्जी म्हणाले की, उच्च प्रतीच्या चहाचे प्रतीक असलेल्या मकाईबारीने दुसºया टप्प्यातील संपूर्ण मौल्यवान चहा गमावला आहे. आमचे सुमारे ३0 हजार किलो चहाचे उत्पादन आंदोलन काळात वाया गेले. आमच्या या मळ्यात ६५0 कामगार काम करतात. त्यात ३५0 पाने खुडणारे कामगार आहेत. कॅसलटन नामक अभिजात चहा मळ्याची मालक असलेली गुडरिक टी कंपनीही कामगार परतण्याची प्रतीक्षा करीत आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ अरुण सिंग यांनी सांगितले की, आमचा चहा मळा कधीच बंद नव्हता. सुमारे ७0 ते ८0 कामगार कामावर परतले आहेत. मळ्यात सफाईचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून कामावर येण्याचे वचन १३२ कामगारांनी दिले आहे. आम्हाला त्यांची प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर काम सुरू व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
अरुण सिंग यांनी सांगितले की, दार्जिलिंग बंदमुळे ४ लाख किलो चहा हातातून गेला. गुडरिक कंपनीचे पाच चहा मळे दार्जिलिंग पर्वतराजीत आहेत. (वृत्तसंस्था)
>सर्व कामे ठप्प, कोट्यवधींचे नुकसान
सरकारी मालकीच्या अ‍ॅण्ड्र्यू युले अ‍ॅण्ड कंपनीलाही अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे. कंपनीचे सीएमडी देबासिस जना यांनी सांगितले की, आमचा चहा मळा आम्ही बंद केलेलाच नव्हता. तथापि, कामगारच कामावर येत नसल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. कामगार अजूनही परतलेले नाहीत. कंपनीला दुसºया हंगामातील ३0 हजार किलो मौल्यवान चहाचे नुकसान सोसावे लागले आहे. हिंसक बंद आंदोलनामुळे कंपनीला हे नुकसान सहन करावे लागले.

Web Title: Due to the shutdown of Darjeeling, the loss of lakh crores of tea was lost; Now the laborers wait for the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.