Lokmat Money > बिझनेस न्यूज > रोखीच्या तीव्र टंचाईमळे प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घट

रोखीच्या तीव्र टंचाईमळे प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घट

प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत गेल्या जून महिन्यात गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत ४.६ टक्क्यांची घट होऊन २,२४,७५५ वाहने विकली गेली आहेत,

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:30 AM2019-07-17T04:30:45+5:302019-07-17T04:30:59+5:30

प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत गेल्या जून महिन्यात गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत ४.६ टक्क्यांची घट होऊन २,२४,७५५ वाहने विकली गेली आहेत,

Decrease in retail sales of passenger vehicles due to the severe shortage of cash | रोखीच्या तीव्र टंचाईमळे प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घट

रोखीच्या तीव्र टंचाईमळे प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घट

नवी दिल्ली : प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत गेल्या जून महिन्यात गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत ४.६ टक्क्यांची घट होऊन २,२४,७५५ वाहने विकली गेली आहेत, असे फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) मंगळवारी म्हटले. मान्सून उशिरा आल्यामुळे रोख पैशांच्या टंचाईचा हा परिणाम आहे.
जून २०१८ मध्ये प्रवासी वाहने २,३५,५३९ एवढी विकली गेली होती. प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये गेल्या जून महिन्यात १७.५४ टक्क्यांची घट होऊन २,२५,७३२ वाहने विक्री झाली होती. जून २०१८ मध्ये घाऊक विक्रेत्यांनी २,७३,७४८ वाहने विकली होती. गेल्या जूनमध्ये दुचाकीची किरकोळ विक्री ५ टक्क्यांनी घटून १३,२४,८२२ वाहने विकली गेली होती तर गेल्या वर्षी याच महिन्यात १३, ९४,७७० वाहने विक्री झाली होती.
जून महिन्याचा प्रारंभ आशा आणि सकारात्मक दृष्टिकोनासह मासिक विक्रीचा शेवट मात्र खूपच विलंबाने आलेल्या पावसामुळे रोखीच्या तीव्र टंचाईने झाला, असे फाडाचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी निवेदनात म्हटले. वाहनांबाबत चौकशी मोठ्या संख्येने केली जात असली तरी ग्राहकांची खरेदीची तयारी तेवढी नाही आणि सगळ््याच प्रकारच्या वाहनांची किरकोळ खरेदी लांबणीवर टाकली गेल्याचे
दिसले, असे काळे म्हणाले. यावर्षी एप्रिल ते जून तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री एक टक्क्याने घटून ७,२८,७८५ एवढी झाली होती तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ती ७,३६,२९० एवढी झाली होती.
>१६,४६,७७६ वाहनांची विक्री
व्यावसायिक वापराच्या वाहनांची विक्री १९.३ टक्क्यांनी खाली येऊन ४८,७५२ वाहने (जून २०१८ मध्ये ६०,३७८ वाहने) विकली झाली होती. तीन चाकी वाहनांची विक्री गेल्या जून महिन्यात २.८ टक्क्यांनी खाली येऊन ४८,४४७ वाहने विकली गेली होती तर गेल्या वर्षी याच महिन्यात ४९,८३७ वाहने विक्री झाली होती.
गेल्या महिन्यात सगळ््या प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत ५.४ टक्क्यांची घट होऊन १६,४६,७७६ वाहने विकली गेली होती तर गेल्या वर्षी जूनमध्ये १७,४०,५२४ वाहने विकली गेली होती.

Web Title: Decrease in retail sales of passenger vehicles due to the severe shortage of cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन