Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांच्या कुकर्जांमध्ये घट - सीतारामन

बँकांच्या कुकर्जांमध्ये घट - सीतारामन

केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशातील व्यावसायिक बँकांची कुकर्जे चालू वर्षात १.०२ लाख कोटींनी घटून ९.३४ लाख कोटींवर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:28 AM2019-07-17T04:28:54+5:302019-07-17T04:28:59+5:30

केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशातील व्यावसायिक बँकांची कुकर्जे चालू वर्षात १.०२ लाख कोटींनी घटून ९.३४ लाख कोटींवर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

Decrease in Banking Cuts - Sitaraman | बँकांच्या कुकर्जांमध्ये घट - सीतारामन

बँकांच्या कुकर्जांमध्ये घट - सीतारामन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशातील व्यावसायिक बँकांची कुकर्जे चालू वर्षात १.०२ लाख कोटींनी घटून ९.३४ लाख कोटींवर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, कुकर्जे कमी करण्यासाठी सरकारने व्यापक रणनीती आखली आहे. त्यातूनच पारदर्शक पद्धतीने एनपीए निश्चित करणे, कुकर्ज कमी करण्यासाठी सार्वजनिक बँकांमध्ये योग्य सुधारणा करून सशक्त बनवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिवाळखोरी संहितेच्या सहाय्याने पत पुरवठा करणारा आणि कर्जदार यांच्यातील नाते आमूलाग्रपणे बदलून टाकले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांकडून नियंत्रण काढून घेण्यात आले आहे. कर्जबुडव्यांना बाजारातून कर्ज घेण्यापासून रोखणे व त्यांना वसुली प्रक्रियेतून दूर ठेवणे आदी पावले उचलण्यात आली आहेत.

Web Title: Decrease in Banking Cuts - Sitaraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.