Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांमुळे नाहीत , रज्जूभाई श्रॉफ यांचे मत

शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांमुळे नाहीत , रज्जूभाई श्रॉफ यांचे मत

यवतमाळ जिल्ह्यात झालेले शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेले नसून माध्यमांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसृत केलेली ती केवळ एक वेदना आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:33 AM2017-11-11T04:33:20+5:302017-11-11T04:33:47+5:30

यवतमाळ जिल्ह्यात झालेले शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेले नसून माध्यमांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसृत केलेली ती केवळ एक वेदना आहे

The death of farmers is not due to pesticides, Rajjabhai Shroff's opinion | शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांमुळे नाहीत , रज्जूभाई श्रॉफ यांचे मत

शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांमुळे नाहीत , रज्जूभाई श्रॉफ यांचे मत

सोपान पांढरीपांडे
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेले शेतक-यांचे मृत्यू कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेले नसून माध्यमांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसृत केलेली ती केवळ एक वेदना आहे, असे मत युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबंध संचालक रजनीकांत (रज्जूभाई) श्रॉफ यांनी व्यक्त केले आहे.
‘लोकमत’शी बोलताना ८३ वर्षीय श्रॉफ म्हणाले, या प्रकरणाचा तपास करणाºया विशेष चौकशी चमू (एसआयटी)चे अध्यक्ष पीयूष सिंग यांनीसुद्धा हे मृत्यू कीटकनाशकांमुळे झाल्याचा कुठलाही ठोस पुरावा अजून समोर आला नसल्याचे म्हटले आहे. दुसरे म्हणजे, क्रॉप प्रोटेक्शन फेडरेशन आॅफ इंडियाच्या एस गणेशन यांनी केलेल्या चौकशी अहवालात व यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या ‘पोस्टमॉर्टेम’ अहवालातसुद्धा हे मृत्यू कीटकनाशकांच्या विषबाधेने झाल्याचा पुरावा समोर आलेला नाही. पोस्टमार्टेम अहवालात उंदीर मारण्याच्या औषधांच्या विषबाधेचा उल्लेख असला तरी रक्तात कीटकनाशकांचा अंश सापडल्याचा कुठलाही पुरावा नाही, फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरीच्या तपासणीतही हीच बाब समोर आली आहे. तर गणेशन यांच्या अहवालात ‘अ‍ॅसिफेट’ व ‘मोनोक्रोटोफॉस’ या कीटकनाशकांची मृत्यू घडून येण्यासाठी आवश्यक असलेली तीव्रता दर्शवली आहे, त्यानुसार १६१ ग्रॅम अ‍ॅसिफेट व ८४० ग्रॅम मोनोक्रोटोफॉस शरीरात गेले तर मृत्यू ओढवू शकतो. प्रत्यक्षात फवारणीच्या द्रावणात या कीटकनाशकांचे प्रमाण केवळ १ टक्का आहे, असेही श्रॉफ म्हणाले.
कृषी क्षेत्र गतिमान होण्यासाठी भ्रष्टाचार थांबवून दळणवळण व साठवण क्षमता कार्यक्षम करण्याची नितांत आवश्यकता आहे, त्यासाठी सरकार व शेतकरी यांना सोबत चालावे लागेल तरच शेतकºयांचे उत्पन्न २०२२ साली दुप्पट होऊ शकेल. भारतात अतिशय उच्च श्रेणीचे मनुष्यबळ उपलब्ध आहे; पण आपण त्यांची क्षमता पूर्णत: वापरण्यात अयशस्वी ठरलो आहोत, असेही मत श्रॉफ यांनी व्यक्त केले.
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (यूपीएल) समूहाचे देशात १४ तर विदेशात १९ कारखाने असून, हा समूह विकसित देशापेक्षा खूपच स्वस्त किमतीत कीटकनाशके बनवतो. सध्या समूहाची देशांतर्गत उलाढाल ५ हजार कोटी आहे तर निर्यात १२ हजार कोटी आहे. १९६०च्या दशकात लघुउद्योग म्हणून श्रॉफ यांनी या समूहाची स्थापना केली होती. ‘‘मला सुरुवातीपासूनच विनाशकारी रसायनांचे वेड होते म्हणून मी केमिकल इंजिनीअरिंग केले व फॉस्फोरस बनविण्याची सर्वांत स्वस्त पद्धत शोधून काढली. याचे त्या वेळी, वेस्टर्न इंडिया मॅच कंपनी (विमको) या बहुराष्ट्रीय कंपनीने कौतुक केले होते. १९७२ साली आम्हाला नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कौन्सिलचे सुवर्णपदक मिळाले आणि त्यानंतर आम्ही कधीच मागे वळून बघितले नाही,’’ असे श्रॉफ म्हणाले.
जगभर पसरलेला हा व्यवसाय आपण कसा सांभाळता या प्रश्नावर श्रॉफ विनयपूर्वक म्हणाले, ‘‘मी काहीच काम करत नाही. माझी मुले जयदेव आणि विक्रम व ५७०० अतिशय प्रज्ञावंत कर्मचारी हे आज यूपीएलचा कार्यभार बघत आहेत. आमच्यासाठी भविष्य उज्ज्वल आहे,’’ असेही श्रॉफ म्हणाले.

...त्यामुळे होत आहे कृषीमालाची नासाडी
भारतातील कृषी क्षेत्राच्या दुरवस्थेबद्दल बोलताना ‘क्रॉप प्रोटेक्शन किंग आॅफ इंडिया’ असे संबोधले जाणारे श्रॉफ म्हणाले, सरकारी अधिकाºयांचा भ्रष्टाचार, अकार्यक्षम व अपर्याप्त दळणवळणाच्या सुविधा व साठवणूक क्षमता यामुळे कृषी क्षेत्राचा विकास खुंटीत झाला आहे. जगात सर्वाधिक आंबे भारतात पिकतात; पण तरीही भारतातून गेल्या वर्षी फक्त ३९ हजार टन आंब्याची निर्यात झाली तर शेजारच्या पाकिस्तानने एक लाख टन आंब्याची निर्यात केली. भारतात आपले शेतकरी आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नधान्य व फळे पिकवतात; पण साठवण क्षमता नसल्याने हे उत्पादन खुल्या आकाशाखाली ठेवले जाते व शेवटी वाया जाते. याचबरोबर निर्यातीसाठी लागणारे परवाने उदा. फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट इत्यादींसाठी अधिकाºयांना चिरीमिरी द्यावी लागते. यामुळेही विकासात अडसर निर्माण झाला आहे, असे श्रॉफ म्हणाले.

Web Title: The death of farmers is not due to pesticides, Rajjabhai Shroff's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी