Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉटनकिंगची उत्पादने आणखी आकर्षक दरात; व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न

कॉटनकिंगची उत्पादने आणखी आकर्षक दरात; व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न

कॉटन गारमेंट क्षेत्रात देशात आघाडीचा ब्रँड असणाऱ्या ‘कॉटनकिंग’ने ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न’चा अवलंब करीत सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या किमती कमी केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 03:38 AM2019-05-10T03:38:50+5:302019-05-10T03:39:01+5:30

कॉटन गारमेंट क्षेत्रात देशात आघाडीचा ब्रँड असणाऱ्या ‘कॉटनकिंग’ने ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न’चा अवलंब करीत सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या किमती कमी केल्या आहेत.

Cottacking products at an attractive price; Value for Money Pattern | कॉटनकिंगची उत्पादने आणखी आकर्षक दरात; व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न

कॉटनकिंगची उत्पादने आणखी आकर्षक दरात; व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न

पुणे  - कॉटन गारमेंट क्षेत्रात देशात आघाडीचा ब्रँड असणाऱ्या ‘कॉटनकिंग’ने ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न’चा अवलंब करीत सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या किमती कमी केल्या आहेत.

वर्षानुवर्षांपासून जोडलेल्या ग्राहकांसाठी आणखी काय करता येईल, यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. सध्या कापसाचे भाव कमी झाले आहेत. त्याचवेळी तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्पादन क्षमता वाढविता आल्याने उत्पादन मूल्य कमी झाले. त्याचा थेट फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्यातूनच ‘रेडी टूू लीड’ हे ब्रीद घेऊन कॉटनकिंगने उत्पादनांचे दर ग्राहकांच्या दृष्टीने आणखी आकर्षक केल्याचे कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

दर आकर्षक झाल्याने ग्राहकाला १०० ते ५०० रुपयांपर्यंत लाभ मिळतो आहे. उदा. शंभर टक्के कॉटनमधील कॅज्युअल प्रकारातील शर्टस् आता फक्त ५९५ रुपयांमध्ये मिळतील. एरोसॉफ्ट, गिझा कॉटन यांसारख्या ग्राहकप्रिय व्हरायटीज्देखील आता पूर्वीच्या तुलनेत १०० ते ३०० रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध झाल्या आहेत, असेही मराठे म्हणाले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कामगारांची क्षमता वाढविण्याबरोबरच सौरऊर्जा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यामुळे विजेवरील व पाण्यावरील खर्चात लक्षणीय बचत झाली आहे. प्रकल्पही संपूर्णत: पर्यावरणपूरक झाला आहे. कच्चा मालाच्या खरेदीचे प्रमाण वाढविल्याने तिथेही मोठी बचत झाली. यातूनच किमती कमी करीत थेट ग्राहकांना फायदा देणे शक्य झाले आहे. ग्राहक या सुवर्णसंधीचा नक्कीच फायदा उठवतील, असा विश्वासही कौशिक मराठे यांनी बोलून दाखविला. (व्यापार प्रतिनिधी)

Web Title: Cottacking products at an attractive price; Value for Money Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई