Lokmat Money > बिझनेस न्यूज > इज आॅफ डुइंग बिझनेसवरून वाद

इज आॅफ डुइंग बिझनेसवरून वाद

गुंतवणूक आणि इज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा भाजपा आणि राज्य सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात मात्र, महाराष्ट्र पहिल्या दहामध्येसुद्धा नसल्याचे सिद्ध झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:45 AM2018-07-12T05:45:11+5:302018-07-12T05:45:22+5:30

गुंतवणूक आणि इज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा भाजपा आणि राज्य सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात मात्र, महाराष्ट्र पहिल्या दहामध्येसुद्धा नसल्याचे सिद्ध झाले आहे.

Claims from Is of Driving Business | इज आॅफ डुइंग बिझनेसवरून वाद

इज आॅफ डुइंग बिझनेसवरून वाद

मुंबई - गुंतवणूक आणि इज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा भाजपा आणि राज्य सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात मात्र, महाराष्ट्र पहिल्या दहामध्येसुद्धा नसल्याचे सिद्ध झाले आहे. सातत्याने खोटे दावे करत दिशाभूल केल्याबद्दल भाजपा आणि राज्य सरकारने जनेतची माफी मागावी, अशी मागणी काँगे्रसने केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची जाहिरातबाजी आणि इव्हेंटवर केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीतून केवळ जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे.
यातून राज्यातील जनतेच्या हाती काहीही लागले नाही. ८ लाख कोटी आणि १६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे काय झाले, याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

महाराष्ट्रच अव्वल - भाजपाचा पलटवार
देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे रिझर्व्ह बँक सांगते, नीति आयोगाने म्हटले आहे. आर्थिक सर्वेक्षणातूनही ही बाब सिद्ध झाली आहे. तरीही वारंवार खोटे दावे करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत शहाणे का होत नाही, असा खोचक सवाल भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत बोलताना केला.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, काँग्रेसला डीआयपीपीचे सर्वेक्षण कळलेलेच नाही. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आधी नीट माहिती घ्यावी आणि मग बोलावे.

Web Title: Claims from Is of Driving Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.