Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर चीनचा वाढीव कर १ जूनपासून

अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर चीनचा वाढीव कर १ जूनपासून

अमेरिकेने लावलेल्या वाढीव कराला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर वाढीव कर लावण्याची घोषणा केली असून, १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:59 AM2019-05-15T00:59:46+5:302019-05-15T01:00:03+5:30

अमेरिकेने लावलेल्या वाढीव कराला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर वाढीव कर लावण्याची घोषणा केली असून, १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

China's tax on US $ 60 billion will start from June 1 | अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर चीनचा वाढीव कर १ जूनपासून

अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर चीनचा वाढीव कर १ जूनपासून

बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिकेने लावलेल्या वाढीव कराला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर वाढीव कर लावण्याची घोषणा केली असून, १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील कर १० टक्क्यांवरून २५ टक्के केला आहे. याशिवाय चीनच्या सर्वच वस्तूंवरील कर वाढविण्याची तयारी अमेरिकेने चालविली आहे. त्यानुसार ३०० कोटींच्या चिनी वस्तूंवर नव्याने अतिरिक्त कर लावले जाणार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या अनेक वस्तूंवरील कर वाढविले आहेत. ५ टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंतच्या कराचा त्यात समावेश आहे. चिनी मंत्रिमंडळाच्या दर निर्धारण आयोगाने यासंबंधीचे निवेदन जारी केले आहे. दरम्यान, चीनने करवाढ केल्यास वाईट परिणाम होतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
सीपेक विरोधातील आवाज दडपला जातोय
दरम्यान, पाकव्याप्त काश्मिरात सुरू असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपेक) आवाज दडपला जात असल्याची तक्रार अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या प्रशासनातील अधिकारी शमिला चौधरी यांनी केली आहे. अमेरिकी काँग्रेस समितीसमोर दिलेल्या साक्षीत त्यांनी ही तक्रार केली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या तज्ज्ञ
म्हणून काम करणाऱ्या चौधरी यांनी सांगितले की, सीपेकला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही अथवा अतिरेकी ठरविले जाते. त्यामुळे माध्यमेही या प्रकल्पावर टीका करायला घाबरतात. (वृत्तसंस्था)

‘धोकादायक’ यादीत चीन-पाकच्या कंपन्या
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणाºया १२ विदेशी कंपन्यांची एक यादी अमेरिकेने जारी केली आहे. या कंपन्यांना संवेदनशील तंत्रज्ञान दिले जाऊ नये, म्हणून ही यादी तयार करण्यात आली आहे.
या यादीतील चार कंपन्यांचे अस्तित्व चीन आणि हाँगकाँग, अशा दोन्ही ठिकाणी आहे. दोन कंपन्या चीनमधील, एक पाकिस्तानी आणि पाच कंपन्या अमिराती व्यक्तीच्या आहेत, असे अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Web Title: China's tax on US $ 60 billion will start from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन