lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा आर्थिक वृद्धिदर २७ वर्षांच्या नीचांकावर

चीनचा आर्थिक वृद्धिदर २७ वर्षांच्या नीचांकावर

चीनच्या आर्थिक वृद्धी दराची गती तीन दशकांच्या नीचांकावर ६.२ टक्क्यांवर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:23 AM2019-07-16T04:23:58+5:302019-07-16T04:24:05+5:30

चीनच्या आर्थिक वृद्धी दराची गती तीन दशकांच्या नीचांकावर ६.२ टक्क्यांवर आली आहे.

China's economic growth rate dropped to 27-year low | चीनचा आर्थिक वृद्धिदर २७ वर्षांच्या नीचांकावर

चीनचा आर्थिक वृद्धिदर २७ वर्षांच्या नीचांकावर

बीजिंग : चीनच्या आर्थिक वृद्धी दराची गती तीन दशकांच्या नीचांकावर ६.२ टक्क्यांवर आली आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने चीनच्या जीडीपी वृद्धी दरात घट झाली आहे. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार सकल घरेलु उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धिदर पहिल्या तिमाहीत ६.४ टक्क्यांवरून कमी होऊन ६.२ टक्के टक्क्यांवर आला आहे. जीडीपीचा हा दर दुसऱ्या तिमाहीतील गत २७ वर्षांतील सर्वात कमी आहे.
यामुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देशाचा आर्थिक वृद्धिदर २००९ मध्ये जागतिक आर्थिक मंदीतही ६.४ टक्क्यांवरून खाली आला नव्हता. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या सहामाहीत सकल घरेलू उत्पादन वार्षिक आधारावर ६.३ टक्क्यांनी वाढून ४५,०९० अब्ज युआन (जवळपास ६,५६० अब्ज डॉलर) झाले. दुसºया तिमाहीत जीडीपी वृद्धिदराची गती ६.२ टक्के आहे. जीडीपीची ही आकडेवारी पूर्ण वर्षासाठीच्या सरकारच्या ६.० ते ६.५ टक्के या लक्ष्यानुसार आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: China's economic growth rate dropped to 27-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.