Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात गुंतवणूक

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात गुंतवणूक

महाराष्ट्र व कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य दृढ होणार असून, माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आदिवासी कल्याण आदी क्षेत्रांतील सहकार्याच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्युबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:45 AM2018-06-14T00:45:27+5:302018-06-14T00:45:27+5:30

महाराष्ट्र व कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य दृढ होणार असून, माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आदिवासी कल्याण आदी क्षेत्रांतील सहकार्याच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्युबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली.

CDPQ, Bombardier invested in the state | सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात गुंतवणूक

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात गुंतवणूक

विशेष प्रतिनिधी  
मुंबई - महाराष्ट्र व कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य दृढ होणार असून, माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आदिवासी कल्याण आदी क्षेत्रांतील सहकार्याच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्युबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली. निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगाने महाराष्ट्रात गुंतवणुकीचीतयारी दर्शविली आहे.
मॉन्ट्रिएल येथे मुख्यमंत्र्यांनी क्युलार्ड यांची भेट घेतली. अधिकाधिक रोजगार संधीसाठी बंदर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र व क्युबेक प्रांत यांच्यात या तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाविषयी करार झाला. क्युबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारमंत्री क्रिस्टिन सेंट पेरी याही तेव्हा उपस्थित होत्या.
सीडीपीक्यूचे अध्यक्ष मायकेल साबिया यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. कॅनडातून अधिकाधिक पेन्शन फंड गुंतवणूक भारतात यावी, हा या भेटीचा हेतू होता. भारतातील काही संस्थांशी भागीदारी व रिटेल व्यावसायिकांसह काम करण्याचा सीडीपीक्यूचा मानस आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, लॉजिस्टिक पार्क आदी क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.
शिष्टमंडळाने आघाडीची विमान व रेल्वे उत्पादक कंपनी बॉम्बार्डिअरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष पिअरी ब्युदाँ यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील मेट्रोसह परिवहनविषयक पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्याची तयारी या कंपनीने दर्शविली.

Web Title: CDPQ, Bombardier invested in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.