Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्या बात है... फरार घोटाळेबाजाला भारतात आणण्यात प्रथमच यश; CBI ची कामगिरी

क्या बात है... फरार घोटाळेबाजाला भारतात आणण्यात प्रथमच यश; CBI ची कामगिरी

विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:51 AM2018-10-16T11:51:09+5:302018-10-16T11:52:19+5:30

विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर

CBI brings back fraudster mohammad yahya who had fled india in 2009 | क्या बात है... फरार घोटाळेबाजाला भारतात आणण्यात प्रथमच यश; CBI ची कामगिरी

क्या बात है... फरार घोटाळेबाजाला भारतात आणण्यात प्रथमच यश; CBI ची कामगिरी

नवी दिल्ली - देशातील बँकांशी दगाफटका करत विदेशात पळून गेलेल्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने  मोहम्मद याह्या नामक फरार घोटाळेबाजाला अटक केली आहे. मोहम्मदने 9 वर्षांपूर्वी भारतातून पलायन केले होते. तत्पूर्वी त्याने देशातील अनेक बँकांना गंडा घातला होता. मोहम्मदने 46 लाख रुपये घेऊन बँगलोरमधून पलायन केलं होतं. 

विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यासाठी ऑगस्ट महिन्यात कायदाही बनविण्यात आला आहे. त्यानंतर, हे पहिलेच प्रकरण आहे. ज्यामध्ये एका पळपुट्या आरोपीला सरकारने भारतात आणले आहे. बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहूल चोक्सीपेक्षा या घोटाळेबाजाने अत्यंत कमी घोटाळा केला आहे. मात्र, तपास यंत्रणांनी त्याला अटक करणे हे या मोहिमेच्या दृष्टीने पडलेलं पहिलं सकारात्मक पाऊल आहे. 

दरम्यान, याह्या यास बेहरीन येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय तपास यंत्रणांची त्याच्यावर नजर होती. सन 2009 मध्ये याह्याविरुद्ध सीबीआयने कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, तोपर्यंत तो देश सोडून पळाला होता. सध्या भारत सरकारकडे 28 पळपुट्यांची यादी असून त्यामध्ये 6 महिलांचाही समावेश आहे.
 

Web Title: CBI brings back fraudster mohammad yahya who had fled india in 2009

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.