lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केस प्रत्यारोपणावरही १८ टक्के ‘जीएसटी’चा भार

केस प्रत्यारोपणावरही १८ टक्के ‘जीएसटी’चा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:24 AM2017-07-26T04:24:42+5:302017-07-26T04:24:45+5:30

The case for GST on petroleum products | केस प्रत्यारोपणावरही १८ टक्के ‘जीएसटी’चा भार

केस प्रत्यारोपणावरही १८ टक्के ‘जीएसटी’चा भार

औरंगाबाद : देशभरात १ जुलैपासून जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर लागू झाला आहे. यामध्ये केस प्रत्यारोपणावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याने प्रत्यारोपणानंतर केसांबरोबर डोक्यावर ‘जीएसटी’चाही भार राहणार आहे.
डोक्यावर पुरेसे केस नसल्यामुळे सामोरे जावे लागणाºया समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी केस प्रत्यारोपण करण्याकडे कल वाढत आहे. केस प्रत्यारोपणासाठी जवळपास ६५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. केसांच्या संख्येनुसार खर्च वाढूही शकतो. आता जीटीएसटी लावल्यामुळे केस प्रत्यारोपणासाठी येणाºयांची संख्या अचानक रोडावल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डोक्याच्या समोरील आणि वरील केस गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्यारोपणात डोक्याच्या पाठीमागील केसांचा वापर होतो. केस प्रत्यारोपणासाठी ५० ते ७० रुपये पर ग्राफ्ट असा दर आकारला जातो. एका ग्राफ्टमध्ये एक, दोन अथवा तीन केसांचा समावेश असतो. डोक्याच्या पाठीमागील १२ ते १५ टक्के केसांचा वापर केला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले
केसगळतीमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास खचतो, म्हणून केस प्रत्यारोपण केले जाते; परंतु चैनीची गोष्ट समजून यावर १८ टक्के जीएसटी लावला आहे. जी गोष्ट जन्मापासून आहे म्हणजे आनुवंशिक आहे, त्यावर जीएसटी लावलेला नाही. केसगळतीही आनुवंशिक आहे. तरीही केस प्रत्यारोपणावर जीएसटी लावला आहे. केस लावले म्हणजे सौंदर्यवृद्धी होत नाही. केवळ गेलेले केस लावून टकलेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, असे असोसिएशन आॅफ हेअर रिस्टोरेशन सर्जन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश राजपूत यांनी सांगितले.

Web Title: The case for GST on petroleum products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.