Lokmat Money > बिझनेस न्यूज > बजेटमुळे सेन्सेक्सला ८४० व्होल्टचा शॉक, शेअर बाजार आपटला

बजेटमुळे सेन्सेक्सला ८४० व्होल्टचा शॉक, शेअर बाजार आपटला

- दीर्घकालिन भांडवली नफ्यावर कर लावण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा व वित्तीय तुटीची अंदाजित मूल्य वाढविल्याचा फटका शेअर बाजाराला बसला आणि सेन्सेक्सला एकाच दिवसात ८४० व्होल्टचा अर्थात अंकांचा शॉक बसला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:56 AM2018-02-03T03:56:06+5:302018-02-03T03:56:27+5:30

- दीर्घकालिन भांडवली नफ्यावर कर लावण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा व वित्तीय तुटीची अंदाजित मूल्य वाढविल्याचा फटका शेअर बाजाराला बसला आणि सेन्सेक्सला एकाच दिवसात ८४० व्होल्टचा अर्थात अंकांचा शॉक बसला.

The budget defied the Sensex with 840 volts shock, the stock market crash | बजेटमुळे सेन्सेक्सला ८४० व्होल्टचा शॉक, शेअर बाजार आपटला

बजेटमुळे सेन्सेक्सला ८४० व्होल्टचा शॉक, शेअर बाजार आपटला

मुंबई  - दीर्घकालिन भांडवली नफ्यावर कर लावण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा व वित्तीय तुटीची अंदाजित मूल्य वाढविल्याचा फटका शेअर बाजाराला बसला आणि सेन्सेक्सला एकाच दिवसात ८४० व्होल्टचा अर्थात अंकांचा शॉक बसला. गेल्या अडीच वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली. विक्रीचा भडीमार सुरू राहिल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १०,८०० अंकांखाली उतरला.
या मोठ्या घसरणीचा गुंतवणूदारांच्या शेअर मूल्यांना फटका बसला. गुंतवणूदारांकडील शेअर्सचे मूल्य एकाच दिवसांत ४.६ लाख कोटी रूपयांनी कमी झाले. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सअंतर्गत असलेल्या ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांच्या शेअर्स घसरले.
बजेटआधी सेन्सेक्सने ३६ हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र अरूण जेटली यांनी दीर्घकालिन भांडवली नफ्यावर १० टक्के कर लावला. कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना देण्यात येणाºया लाभांश वितरण करात कपात करण्यासंबंधीही निर्णय झाला नाही. यामुळे बजेटच्या दिवशीच गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री सुरू केली होती. हाच ट्रेंड दुसºया दिवशीही कायम राहिला. सेन्सेक्स ८३९.९१ अंकांनी घसरून ३५,०६६.७५ अंकांवर बंद झाला. यापूर्वी २४ आॅगस्ट २०१५ रोजी सेन्सेक्स १६२४ अंकांनी घसरला होता. त्यानंतर सर्वांत मोठी डुबकी ठरली आहे.

ही नफेखोरीच, आणखी घसरणीचा अंदाज
दोन महिन्यांत सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाली होती. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी भांडवली नफ्याच्या करासाठी ३१ जानेवारी हा बेस पकडला. यामुळे वर्षभरापूर्वी शेअर खरेदी केलेल्यांवर या भांडवली नफा कराचा फार परिणाम नाही. यामुळेच मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी शेअर्सची विक्री केली. नवीन कर आला की हे होतच असते. पुढील आठवड्यात यांत आणखी घसरणीचा अंदाज आहे.
- राजेश पटवर्धन, मुख्य विपणन अधिकारी, एलआयसी म्युच्युअल फंड

वित्तीय तुटीच्या अंदाजाचा परिणाम

जेटलींनी वित्तीय तूट ३.५ टक्के राहण्याचे उद्दिष्ट बजेटमध्ये जाहीर केले. यापूर्वी हे उद्दिष्ट ३.२ टक्के ठेवण्यात आले होते. याचाच अर्थ वित्तीय तूट नियंत्रणात राहणार नसल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

बजेटदिनी जोरात विक्री

- 358.50 कोटी रुपयांचे शेअर्स देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विकेले.
- 1099.78 कोटी रुपयांचे शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांनी विकून टाकले.

Web Title: The budget defied the Sensex with 840 volts shock, the stock market crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.