Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

आर्थिक वर्षं 2017-18मध्ये भाजपाला जवळपास 1027.34 कोटी रुपयांचं उत्पन्न देणग्या व इतर स्रोतातून मिळालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 10:42 AM2018-12-18T10:42:02+5:302018-12-18T10:43:32+5:30

आर्थिक वर्षं 2017-18मध्ये भाजपाला जवळपास 1027.34 कोटी रुपयांचं उत्पन्न देणग्या व इतर स्रोतातून मिळालं आहे.

bjp gets 1027 crore rupees in 2017 18 congress didnt file report | वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

Highlightsआर्थिक वर्षं 2017-18मध्ये भाजपाला जवळपास 1027.34 कोटी रुपयांचं उत्पन्न देणग्या व इतर स्रोतातून मिळालं. भाजपानं यातील 74 टक्के (758.47 कोटी रुपये) खर्च केला आहे. काँग्रेस पक्षानं अद्यापही या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट जमा केलेला नाही. 

नवी दिल्ली- आर्थिक वर्षं 2017-18मध्ये भाजपाला जवळपास 1027.34 कोटी रुपयांचं उत्पन्न देणग्या व इतर स्रोतातून मिळालं आहे. भाजपानं यातील 74 टक्के (758.47 कोटी रुपये) खर्च केला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स(एडीआर) यांच्या रिपोर्टमधून हे समोर आलं आहे. एडीआरच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षानं अद्यापही या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट जमा केलेला नाही. 
रिपोर्टनुसार, 2017-18मध्ये बसपाची एकूण कमाई 51.7 कोटी रुपये होती. ज्यातील बसपानं फक्त 29 टक्के म्हणजेच 14.78 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर राष्ट्रवादी असा एकमेव पक्ष आहे ज्यानं एकूण उत्पन्नाच्या 8.15 कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केले आहेत. त्यांचा खर्च 8.84 कोटी रुपये आहे. 
2016-17च्या तुलनेत भाजपाच्या उत्पन्नात घट आली आहे. सहा राष्ट्रीय पक्षांनी एकूण उत्पन्नाच्या 1041.80 कोटी रुपयांपैकी 86 टक्के स्वेच्छेने दान केले आहेत. 2017-18मध्ये भाजपानं 210 कोटी रुपये हे निवडणूक बाँडच्या माध्यमातून कमावल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनं भाजपावर करचोरीचा आरोप केला होता. निवडणूक बाँड आता कर चोरीसाठी एक पर्याय झाला आहे. राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या अशाच माध्यमातून दिल्या जातात. 

Web Title: bjp gets 1027 crore rupees in 2017 18 congress didnt file report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.