The beginning of the year started selling down the stock market on the very first day | वर्षाची सुरुवात घसरणीने, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी विक्रीचा मारा
वर्षाची सुरुवात घसरणीने, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी विक्रीचा मारा

मुंबई : सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. वित्तीय घसरण आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले. नववर्षाच्या सुट्टीमुळे जागतिक बाजार बंद राहिले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २४४.0८ अंकांनी घसरून ३३,८१२.७५ अंकांवर बंद झाला. १ डिसेंबरनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली. त्या दिवशी सेन्सेक्स ३१६.४१ अंकांनी घसरला होता. तत्पूर्वी, शुक्रवारी सेन्सेक्स ३४,0५६.८३ अंकांवर बंद होऊन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ९५.१५ अंकांनी घसरून १0,४३५.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांत टीसीएसचे समभाग सर्वाधिक १.६९ अंकांनी उतरले. त्या खालोखाल इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी लि., टाटा स्टील, ओएनजीसी, अदाणी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, एशियन पेंटस्, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँक आणि यस बँक यांचे समभाग घसरले. टाटा मोटर्स, बजाज आॅटो, एमअँडएम, मारुती सुझुकी आणि हीरो मोटोकॉर्प या वाहन कंपन्यांचे समभागही दबावात राहिले. मारुतीच्या डिसेंबरमधील विक्रीत १0 टक्क्यांची वाढ झाली असतानाही समभाग दबावात राहिले.
अमेरिकी कच्च्या तेलाच्या किमती जून २0१५ नंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल ६0 डॉलरच्या वर गेल्या आहेत. बे्रंट नॉर्थ सी क्रूड तेलाच्या डिलिव्हरीचा दर शुक्रवारी ६६.८७ डॉलर प्रतिबॅरल झाला होता. दरम्यान, आशिया आणि युरोपातील बहुतांश मोठे शेअर बाजार नववर्षाच्या सुट्टीमुळे बंद होते. त्याचा परिणामही भारतीय बाजारावर झाला.

अनेक क्षेत्रांत पडझड

बीएसईमधील वाहन, बँका, तंत्रज्ञान, आयटी, धातू, तेल व गॅस, एफएमसीजी, पीएसयू आणि पायाभूत सेवा या सर्वच क्षेत्रात घसरण पाहायला मिळाली. व्यापक बाजारात मात्र तेजीचा कल राहिला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप अनुक्रमे 0.२६ टक्के आणि 0.0८ टक्के वाढीसह बंद झाले.

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

सोलापूर बाजार समिती ; शेतकºयाला मारहाण केलेल्या अडत्याचा परवाना रद्द करण्याचा ठराव

सोलापूर बाजार समिती ; शेतकºयाला मारहाण केलेल्या अडत्याचा परवाना रद्द करण्याचा ठराव

7 hours ago

बाजारात फळभाज्यांची आवक वाढली

बाजारात फळभाज्यांची आवक वाढली

19 hours ago

‘मार्केर्टिंग’ साठी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचा होतोय प्रभावी वापर 

‘मार्केर्टिंग’ साठी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचा होतोय प्रभावी वापर 

2 days ago

काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल

काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल

2 days ago

अकोल्यातील ढेप बाजारपेठ पडली मागे

अकोल्यातील ढेप बाजारपेठ पडली मागे

3 days ago

सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी हमीभाव केंद्राकडे फिरविली पाठ

सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी हमीभाव केंद्राकडे फिरविली पाठ

4 days ago

प्रमोटेड बातम्या

व्यापार अधिक बातम्या

भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

11 hours ago

प्रमुख पर्यटनस्थळी ‘उडान’ने पसरले पंख

प्रमुख पर्यटनस्थळी ‘उडान’ने पसरले पंख

11 hours ago

साडेचार वर्षांत जनतेच्या खात्यांत ५.७८ लाख कोटी केले जमा-मोदी

साडेचार वर्षांत जनतेच्या खात्यांत ५.७८ लाख कोटी केले जमा-मोदी

11 hours ago

जेट एअरवेजच्या बोर्डावरून दूर होण्यास नरेश गोयल तयार; अट मात्र कायम

जेट एअरवेजच्या बोर्डावरून दूर होण्यास नरेश गोयल तयार; अट मात्र कायम

11 hours ago

७२ तासांपेक्षा जास्त काळ केबल बंद राहिल्यास पैसे भरावे लागणार नाहीत

७२ तासांपेक्षा जास्त काळ केबल बंद राहिल्यास पैसे भरावे लागणार नाहीत

11 hours ago

भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

1 day ago