Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! तुमची शंभराची नोट असू शकते बनावट

सावधान! तुमची शंभराची नोट असू शकते बनावट

सावधान : बनावट नोटांत सर्वाधिक ४६% शंभराच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:58 AM2018-08-31T06:58:35+5:302018-08-31T06:59:32+5:30

सावधान : बनावट नोटांत सर्वाधिक ४६% शंभराच्या

Be careful! Your hundred notes can be fake | सावधान! तुमची शंभराची नोट असू शकते बनावट

सावधान! तुमची शंभराची नोट असू शकते बनावट

नवी दिल्ली : तुमच्या खिशातील इतर नोटांच्या तुलनेत १00 रुपयांची नोट बनावट असण्याची शक्यता अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालातील निष्कर्षातून हा अर्थ जाणकारांनी काढला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या २0१७-१८ वित्त वर्षाच्या वार्षिक अहवालानुसार, १00 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. सन २0१७-१८ मध्ये सापडलेल्या एकूण बनावट नोटांत सर्वाधिक ४५.७५ टक्के नोटा शंभराच्या होत्या. देशात २0१७-१८ मध्ये एकूण ५,२२,७८३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यातील ३६.१ टक्के बनावट नोटा रिझर्व्ह बँकेने पकडल्या आहेत. नोटाबंदीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ५00 आणि २,000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटांची नक्कल करणे शक्य नाही, असा दावा नोटबंदीच्या निर्णयानंतर करण्यात आला होता. तथापि, या नोटांच्याही बनावट नोटा आढळून आल्या आहेत! तसेच या नोटांच्या बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढत चालले आहे. त्यापाठोपाठ ५0 रुपये व १00 रुपयांच्याही बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे उघड झाल्याने प्रत्येकाला आपल्याकडील नोट खरी आहे की बनावट आहे, हे सतत तपासून पाहावे लागणार आहे. तसे न केल्यास पकडले जाण्याची आणि त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बनावट नोटांमध्ये तब्बल ९ पटीने वाढ
च्२0१६-१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने कारवायांमध्ये पकडलेल्या बनावट नोटांचे प्रमाण अवघे ४.३ टक्के होते. पुढील वर्षात म्हणजे २0१७-१८ मध्ये त्यात तब्बल नऊ पट वाढ झाली आहे.

नोटांबदीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ५0 रुपयांच्याही बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Be careful! Your hundred notes can be fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.