Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! तुमच्या खात्यातील फक्त 30 टक्केच रक्कम सुरक्षित

सावधान! तुमच्या खात्यातील फक्त 30 टक्केच रक्कम सुरक्षित

देशातील 64 बँकामधील तीन कोटी खातेदारांच्या अकाऊंटवर 11 हजार 302 कोटी रुपये आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 03:49 PM2018-03-18T15:49:57+5:302018-03-18T15:49:57+5:30

देशातील 64 बँकामधील तीन कोटी खातेदारांच्या अकाऊंटवर 11 हजार 302 कोटी रुपये आहेत.

Be careful! Only 30 percent of your money is safe | सावधान! तुमच्या खात्यातील फक्त 30 टक्केच रक्कम सुरक्षित

सावधान! तुमच्या खात्यातील फक्त 30 टक्केच रक्कम सुरक्षित

नवी दिल्ली - देशातील 64 बँकामधील तीन कोटी खातेदारांच्या अकाऊंटवर 11 हजार 302 कोटी रुपये आहेत. या रकमेचा कोणीही दावेदार नसल्याचा खुलासा आरबीआयच्या एका  रिपोर्टमध्ये समोर आला आहे.  यामधील सर्वाधिक रक्कम एसबीआयकडे आहे. एसबीआयकडे 1262 कोटींची रक्कम आहे. तर पीएनबीमध्ये 1250 कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. अन्य राष्ट्रीय बँकेमध्ये 7040 कोटी रुपयांची रक्कम आहे. या पैशांवर कोणाचाही आधिकार नसल्याचे आरबीआयच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या पैशातील 30 टक्के रक्कमेची जिम्मेदारी आरबीआयची आहे. 

त्यामुळं आता सहकारी बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एखाद्या खातेदाराची जेवढी रक्कम जमा असेल त्यापैकी फक्त 30 टक्के रकमेचीच गॅरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे जर बँक बुडालीच तर तुमच्या एकूण जमा रकमेपैकी केवळ 30 टक्के रक्कमच तुम्हाला परत मिळणार आहे. बाकीची रक्कम बुडीत खात्यात जाईल. मग, भले तुमच्या खात्यात लाखो रुपये असू द्या, असा धक्कादायक खुलासा आरबीआयने आपल्या अहवालातून केला आहे. दरम्यान, देशभरातील सर्व प्रकारच्या बँकांमध्ये एकूण जमा रक्कमेपैकी केवळ 30.50 लाख कोटी रुपयांचीच गॅरंटी देण्यात आली आहे.

Web Title: Be careful! Only 30 percent of your money is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक