Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत घडविलेल्या ११,४00 कोटींच्या घोटाळ्यामागील पीएनबी बँकेतील सूत्रधार अधिकारी-कर्मचा-यांनी आंतरबँकीय मेसेजिंग यंत्रणा ‘स्विफ्ट’चा गैरवापर केल्याचे आता समोर येत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:20 AM2018-02-20T03:20:58+5:302018-02-20T03:21:17+5:30

नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत घडविलेल्या ११,४00 कोटींच्या घोटाळ्यामागील पीएनबी बँकेतील सूत्रधार अधिकारी-कर्मचा-यांनी आंतरबँकीय मेसेजिंग यंत्रणा ‘स्विफ्ट’चा गैरवापर केल्याचे आता समोर येत आहे.

The bank officials shared the password to help Narendra Modi | नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

नीरव मोदीला साह्य करण्यासाठी बँक अधिका-यांनी शेअर केले पासवर्ड

नवी दिल्ली : नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत घडविलेल्या ११,४00 कोटींच्या घोटाळ्यामागील पीएनबी बँकेतील सूत्रधार अधिकारी-कर्मचा-यांनी आंतरबँकीय मेसेजिंग यंत्रणा ‘स्विफ्ट’चा गैरवापर केल्याचे आता समोर येत आहे. अधिकारी-कर्मचा-यांनी पासवर्ड शेअर करून, तसेच अपु-या नोंदी करून हा घोटाळा घडवून आणला आणि इतकी वर्षे गोपनीयही ठेवला. त्याबदल्यात अधिकारी व कर्मचाºयांना कोट्यवधी रुपये कमिशन म्हणून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएनबीच्या दक्षिण मुंबईतील ज्या ब्रॅडी शाखेत हा घोटाळा घडला ती शाखा रिझर्व्ह बँक आणि मुंबई शेअर बाजाराच्या कार्यालयांपासून जवळच आहे. सन २0११ ते २0१७ एवढ्या प्रदीर्घ काळात हा घोटाळा गोपनीय कसा राहिला, याचे आश्चर्य बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनाही वाटत आहे.
जाणकारांनी सांगितले की, बँका-बँकांमध्ये वापरल्या जाणाºया मेसेजिंग सिस्टिम ‘स्विफ्ट’चा गैरवापर आणि अपूर्ण लेखा नोंदी यामुळे हा घोटाळा उघडकीस येऊ शकला नाही.
या शाखेचा उपव्यवस्थापक गोकूळनाथ शेट्टी आणि त्याचा सहायक मनोज खरात यांनी हा घोटाळा घडवून आणल्याचे सांगितले जाते. त्यांना अटकही झालेली
आहे. शेट्टीने नीरव मोदीच्या कंपन्यांच्या नावे बनावट लेटर्स आॅफ अंडरटेकिंग जारी केले. त्या आधारावर भारतीय बँकांच्या विदेशी शाखांनी मोदीच्या कंपन्यांना भरमसाट कर्जे दिली. हमीपत्रे देताना शेट्टीने स्विफ्ट यंत्रणेच्या पासवर्डचा गैरवापर केला. मेसेज पाठवणे व मंजूर करणे ही दोन्ही कामे एकाच व्यक्तीने केली. त्यासाठी पासवर्ड शेअर करण्यात आले.
एका अधिकाºयाने सांगितले की, पासवर्ड शेअरिंगचे प्रकार बँकांत रोजच होतात. सकाळी कामाचा बोजा असतो, शंभर-शंभर मागण्या असतात तेव्हा कोणीतरी आपले काम करतो, आपण दुसºयाचे काम करतो. ही कामाची आदर्श पद्धत नाही, पण हे होते. एका अधिकाºयाने सांगितले की, जारी केलेल्या हमीपत्रांच्या नोंदी शेट्टीने पीएनबीच्या अंतर्गत सॉफ्टवेअरमध्ये केल्याच नाहीत. या नोंदी बँकेच्या अंतर्गत सीबीएस यंत्रणेमधून गेल्याच नाहीत. त्यामुळे या नोंदी आॅडिटमध्ये दिसल्या नाहीत. एर्न्स्ट अँड यंगचे भारतातील वित्तीय सेवा प्रमुख अबिझेर दिवाणजी यांनी सांगितले की, भारतीय सरकारी बँकिंग व्यवस्थेत नियंत्रण आणि संतुलन व्यवस्था आहे. तथापि, तिचे पालन होत नाही. त्याचा हा परिणाम आहे.

मोदी व चोकसींनी २४ कंपन्या, १८ व्यावसायिकांनाही बुडवले
लखनऊ/नवी दिल्ली : नीरव मोदी व मेहूल चोकसी जोडगोळीने सरकारी बँकाच नव्हे, तर २४ कंपन्या व १८ व्यावसायिकांनाही दिवाळखोर केले आहे. २0१३ ते २0१७ या काळात या कंपन्या व व्यक्तींनी मोदी-चोकसी यांच्या कंपन्यांची फ्रँचाइजी घेतली होती. दिल्ली, आग्रा, मेरठ, बंगळुरू, म्हैसूर, कर्नाल तसेच गुजरात व राजस्थानातील अनेक ठिकाणांसाठी या फ्रँचाइजी घेण्यात आल्या होत्या. फ्रँचाइजीसाठी मोदी-चोकसीच्या कंपन्यांनी ३ ते २0 कोटी डिपॉझिट घेतले होते. तथापि, नंतर त्यांना हिरे आणि रत्ने दिलीच नाहीत. या कंपन्या-व्यावसायिकांनी दोघांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पीएनबीने गमावले १0,७८१ कोटींचे बाजार भांडवल
पंजाब नॅशनल बँकेने गेल्या बुधवारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. तेव्हापासून बँकेचे समभाग घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत बँकेचे समभाग २८ टक्क्यांनी घसरले आहेत. १0,७८१.१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल बँकेने गमावले आहे.

Web Title: The bank officials shared the password to help Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.