Bandhan Bank launches IPO | बंधन बँक आणणार आयपीओ

कोलकाता : येथील बंधन बँक पुढील वित्तवर्षात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) आणणार असून, यात ११.९ कोटी समभाग सार्वजनिक विक्रीसाठी खुले केले जाणार आहेत.
आयपीओच्या तयारीसाठी आवश्यक असलेले ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस्’ बँकेने सेबीला सादर केले आहे. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने प्रत्येकी १0 रुपये दर्शनी मूल्याचे ११९,२८0,४९४ समभाग सादर करण्याचे प्रस्तावित केले आहे.
यातील ९७,६६३,९१0 समभाग विक्रीसाठी आणि ७,५६५,८0४ समभाग आंतरराष्टÑीय वित्त महामंडळांसाठी खुले असतील. आयएफसी एफआयजी इन्व्हेस्टमेंट कंपनीमार्फत हा आयपीओ आणला जात आहे. हे समभाग बीएसई आणि एनएसईमध्ये  सूचीबद्ध होतील.