Lokmat Money > बिझनेस न्यूज > औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.वर आता महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.ची मालकी

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.वर आता महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.ची मालकी

औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतीतील औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. या अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंग कंपनीच्या ८७५.६ कोटींच्या समभागाची खरेदी महिंद्रा सीआयई ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:29 AM2019-03-13T05:29:56+5:302019-03-13T05:30:40+5:30

औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतीतील औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. या अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंग कंपनीच्या ८७५.६ कोटींच्या समभागाची खरेदी महिंद्रा सीआयई ...

Aurangabad Electricals Ltd. is now owned by Mahindra CIE Automotive Ltd. | औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.वर आता महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.ची मालकी

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.वर आता महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.ची मालकी

औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतीतील औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. या अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंग कंपनीच्या ८७५.६ कोटींच्या समभागाची खरेदी महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि. कंपनीने केली असून, सदर कंपनी ताब्यात घेतली आहे. या गुंतवणुकीमुळे स्पेनमधील सीआयई ग्रुपचा मराठवाड्यात प्रवेश झाला आहे.

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.च्या संचालक मंडळाने मंगळवारी या युनिटचे हस्तांतर महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.कडे केले. ८७५.६ कोटींच्या समभागाच्या खरेदीसह भविष्यातील ६२.२ कोटींच्या डीफर्ड पेमेंटचा समावेश यात आहे. १९८५ साली औरंगाबादेत स्थापन झालेली औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ही अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंगमध्ये अग्रगण्य कंपनी आहे. औरंगाबादेतील बागला ग्रुपचे चितेगाव येथे ३ आणि पुणे व उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे प्रत्येकी एक असे अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे देशातील ५ उत्पादन प्रकल्प आहेत. ऋषी बागला हे या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. या व्यवहारादरम्यान मोतीलाल ओस्वाल यांनी आर्थिक सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्समध्ये ३३०० कर्मचारी असून, ८५० कोटींचा टर्नओहर आहे. देशात आणि परदेशातील दुचाकी आणि कारच्या मूळ सुट्या भागांचे अग्रगण्य उत्पादक आणि टायर कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारच्या वाहनांचा सांगाडा (बॉडीज), ब्रेक आणि इंजिनचे सुटे भाग हाय प्रेशर डाय कास्टिंग आणि ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग प्रक्रियेद्वारे उत्पादित केले जातात.

औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सच्या हस्तांतरणामुळे महिंद्रा सीआयई आॅटोमोटिव्ह लि. आणि औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. या दोन्ही कंपन्यांना महत्त्वाच्या संधी मिळतील, असे सीआयई आॅटोमोटिव्ह लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिजस मारिया हेरेरा म्हणाले, तर या हस्तांतरणामुळे महिंद्रा सीआयई आॅटोमोटिव्ह लि. कंपनीला अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी मिळणार आहे, असे एमसीआयईचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅन्डर अ‍ॅरेनाझा म्हणाले. महिंद्रा सीआयई ही जगभरातील वाहन बाजारात वाहनांचे सुटे भाग आणि इतर वस्तूंचे पुरवठादार असलेल्या स्पेनमधील सीआयईची सहकंपनी आहे.

बागला ग्रुपच्या इतर कंपन्या येथे कार्यरत
महिंद्रा सीआयई कंपनीने केवळ औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सचाच ताबा घेतला आहे. बागला ग्रुपच्या इतर कंपन्या बीएमआर-एचव्हीएसी लि. बीजी एलआयएलएन इलेक्ट्रॉनिक्स लि. सी झेड बीएमआर रेफ्रिजरेशन टेक्नॉलॉजी प्रा.लि. आणि बी.जी. फासनिंग अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इंडस्ट्रिज प्रा.लि. या बागला ग्रुपमध्येच कायम राहतील, असेही व्यवस्थापनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बागला ग्रुपची औरंगाबादमध्ये गुंतवणूक कायम
या घडामोडींबाबत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेकी, औरंगाबाद आणि मराठवाड्यात गुंतवणुकीसाठी नवीन उद्योगांना आकर्षित करणे हे बागला ग्रुपचे धोरण आहे. यापूर्वी आम्ही जगातील ख्यातनाम फोन्टाना आणि ओएमआर कंपन्यांना मराठवाड्यात येण्यासाठी प्रेरित केले आहे. बागला ग्रुप औरंगाबादेत कायम आहे. यापुढेही आम्ही आपला औद्योगिक विकास आणि व्यवसाय विकसित करणार आहोत.

सीआयईमुळे येथे नवीन गुंतवणूक होईल. एमसीआयई आणि सीआयईसोबतच्या भागीदारीमुळे औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सला मोठी चालना मिळेल आणि जगातील अ‍ॅल्युमिनियम डाय कास्टिंगचा लाभ इतरांना होईल. बागला म्हणाले की, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सचे सध्या आहे तेच व्यवस्थापन कायम राहील. ते स्वत: संचालक मंडळातील एक संचालक असतील. कोणत्याही कर्मचाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्यात येणार नाही.

Web Title: Aurangabad Electricals Ltd. is now owned by Mahindra CIE Automotive Ltd.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.