Lokmat Money > बिझनेस न्यूज > ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम... 

ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम... 

जर एखाद्या एटीएमधारक ग्राहकाचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वारस किंवा नातेवाईकांनी याबाबत 2 ते 4 महिन्यात बँकेला सर्व माहिती द्यावी.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 01:32 PM2018-09-24T13:32:51+5:302018-09-24T13:36:55+5:30

जर एखाद्या एटीएमधारक ग्राहकाचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वारस किंवा नातेवाईकांनी याबाबत 2 ते 4 महिन्यात बँकेला सर्व माहिती द्यावी.

ATM card gets 10 lakhs of insurance, please claim with this document | ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम... 

ATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम... 

नवी दिल्ली - आपण जेव्हा बँकेत खाते उघडतो, तेव्हा बँकेकडून आपणास एटीएम कार्ड देण्यात येते. त्याद्वारे आपण एटीएम मशिनमधून आपणास हवे तेव्हा पैसे काढू शकतो. एटीएमच्या वापरामुळे आपला बराचसा त्रास वाचतो. मात्र, हे तुम्हाला कदाचितच माहित असेल की, एटीएमधारकांना इंशुरन्स सुविधाही देण्यात येते. विशेष म्हणजे 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल. 

सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास सर्वच बँकांकडून आणि खासगी बँकांकडूनही ग्राहकांना एक्सीडेंटल हॉस्पिटलायजेशन कवर किंवा एक्सिडेंटल डेश कवर देण्यात येते. त्यानुसार, देण्यात येणाऱ्या सुरक्षेची रक्कम 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे काही बँका क्रेडिट कार्डवरही इंशुरन्स सुरक्षा देतात. मात्र, त्यासाठी आपणास आपले बँक खाते कायम कार्यान्वित ठेवावे लागणार आहे. 

इंशुरन्ससाठी असा करा क्लेम

जर एखाद्या एटीएमधारक ग्राहकाचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वारस किंवा नातेवाईकांनी याबाबत 2 ते 4 महिन्यात बँकेला सर्व माहिती द्यावी. त्यानंतर, याच बँकेत पैसे मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. मग, बँकेकडून संबंधित व्यक्तीच्या खात्याची माहिती घेण्यात येते. म्हणजेच, गेल्या 60 दिवसांत या व्यक्तीने काही व्यवहार केले आहेत का, हे बँकेकडून तपासले जाते. दरम्यान, या इंशुरन्ससाठी वेगवेगळा लाभ ग्राहकांच्या वारसांना मिळतो. म्हणजेच, अपंगत्वापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळे इन्शुरन्सचा लाभ संबंधितांना मिळणार आहे. तसेच साधारण एटीएम कार्ड, मास्टर कार्ड, क्लासिक एटीएमवर वेगवेगळा इंशुरन्स लाभ मिळणार आहे. तसेच तुमच्या कार्डवर किती रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळाले आहे, हे तुम्ही बँकेत जाऊन तपासूही शकता. 

या कागदपत्रांची आवश्यकता भासेल

मृत व्यक्तीशी संबंधित सर्वज कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. 
अपघातील मृत्यू झाला असल्यास सर्वच वैद्यकीय तपासण्यांची पूर्तता करावी लागेल. 
मृत्युचे प्रमाणपत्र, पोलिसांचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि गाडीचे ड्रायव्हिंग लायसन्स यांची पूर्तता करावी लागेल. 

Web Title: ATM card gets 10 lakhs of insurance, please claim with this document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.