Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पवन हंस’च्या विक्रीसाठी सल्लागाराची नियुक्ती

‘पवन हंस’च्या विक्रीसाठी सल्लागाराची नियुक्ती

सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवन हंस लिमिटेड’ची विक्री करण्यासाठी सरकारने वित्त व्यवहार, कायदेशीर सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाची नेमणूक केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:47 AM2017-08-12T00:47:09+5:302017-08-12T00:47:18+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवन हंस लिमिटेड’ची विक्री करण्यासाठी सरकारने वित्त व्यवहार, कायदेशीर सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाची नेमणूक केली आहे.

 Appointment consultant for selling 'Pawan Hans' | ‘पवन हंस’च्या विक्रीसाठी सल्लागाराची नियुक्ती

‘पवन हंस’च्या विक्रीसाठी सल्लागाराची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवन हंस लिमिटेड’ची विक्री करण्यासाठी सरकारने वित्त व्यवहार, कायदेशीर सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाची नेमणूक केली आहे. सरकारच्या वतीने लोकसभेत ही माहिती देण्यात आली. पवन हंस ही सरकारी कंपनी असली तरी ती नफा कमावत आहे. तिच्यात धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्यास अर्थव्यवहार मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी तत्त्वत: मान्यता दिली होती.

- 40 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर ताफ्यात आहेत.

- 900 कर्मचारी कंपनीमध्ये आहेत. त्यापैकी ४५० कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. उरलेले कर्मचारी हंगामी स्वरूपाचे आहेत. १९८५ मध्ये पवन हंसची स्थापना करण्यात आली होती.

- हेलिकॉप्टरची सेवा पुरविणारी पवन हंस ही कंपनी केंद्र सरकार आणि सरकारी मालकीची ओएनजीसी ही कंपनी यांच्या संयुक्त मालकीची आहे.

- नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी एका प्रश्नावर लोकसभेत सांगितले की, आरबीएसए व्हॅल्युएशन अ‍ॅडव्हायजर्स या संस्थेची संपत्ती मूल्यमापक म्हणून नेमणूक केली आहे.

- मंत्रिमंडळ समितीने पवन हंसमधील सरकारच्या हिस्सेदारीची १०० टक्के विक्री करण्यास परवानगी दिली आहे. धोरणात्मक खरेदीदार ही हिस्सेदारी विकत घेऊ शकेल.

- समितीचा आक्षेप आतापर्यंत नफ्यात असलेल्या पवन हंस या बड्या कंपनीच्या निर्गुंतवणुकीस संसदीय
समितीने आक्षेप घेतला आहे.

Web Title:  Appointment consultant for selling 'Pawan Hans'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.