Apple's profit is five times more than Samsung | अ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक

नवी दिल्ली : २०१७च्या तिस-या तिमाहीत अ‍ॅपलने सर्वाधिक १५१ डॉलर प्रति युनिट नफा कमावला. प्रति युनिट ३१ डॉलर नफा कमावून सॅमसंग दुसºया स्थानी राहिली.
संशोधन संस्था काउंटर पॉइंटच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली. जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, अ‍ॅपलचा प्रति युनिट नफा सॅमसंगपेक्षा पाचपट अधिक राहिला. चिनी कंपन्यांच्या सरासरी प्रति युनिट नफ्यापेक्षा तो तब्बल १४ पट अधिक आहे. चिनी कंपन्या हुवेई, ओप्पो आणि विवो यांचा प्रति युनिट नफा अनुक्रमे १५ डॉलर, १४ डॉलर आणि १३ डॉलर राहिला. शिओमीचा प्रति युनिट नफा सर्वांत कमी २ डॉलर प्रति युनिट राहिला.
अ‍ॅपलला सुट्यांच्या हंगामाचा चांगला लाभ होईल. आयफोन एक्स मालिकेच्या महागड्या किमतीमुळे कंपनीचा नफा वाढला. २५६ जीबी क्षमतेच्या आयफोन एक्सला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले, असे काउंटर पॉइंटचे संशोधन संचालक नील शाह यांनी सांगितले. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर हँडसेट उत्पादक कंपन्यांचा नफा वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढला. एका तिमाहीत चिनी कंपन्यांचा नफा प्रथमच १.५ अब्ज डॉलरच्या वर पोहोचला आहे. आतापर्यंत बहुतांश नफ्याची वाटणी सॅमसंग आणि अ‍ॅपल या दोनच कंपन्यांत होत होती. अन्य कंपन्यांचा नफ्यातील वाटा नगण्य असायचा.
>चीनची बाजारपेठ
काउंटर पॉइंटचे सहसंचालक तरुण पाठक यांनी सांगितले की, विविध किमतीची उत्पादने आणि अधिक कार्यक्षम पुरवठा साखळी या माध्यमातून चिनी कंपन्यांनी आपल्या ब्रँडला चांगली बाजारपेठ मिळवून दिली आहे, असे दिसते.


Web Title: Apple's profit is five times more than Samsung
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.