Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड

पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:17 AM2018-03-16T01:17:55+5:302018-03-16T01:17:55+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

Another scam in Punjab National Bank, 9 crores illegal loan has been given | पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड

पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
बँक अधिकाऱ्यांनी लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या (एलओयू) माध्यमातून चंद्री पेपर्स अ‍ॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि. या कंपनीला बेकायदा कर्ज दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने पीएनबीचा माजी सरव्यवस्थापक गोकूळनाथ शेट्टी आणि बँकेच्या एक खिडकी योजनेचा आॅपरेटर मनोज हनुमंत खरात यांच्यासह चंद्री पेपर्सचे संचालक आदित्य रसीवासिया आणि ईश्वरदास अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोकूळनाथ शेट्टी व मनोज खरातला नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या १२,७०० कोटींच्या घोटाळ्यात आधीच अटक करण्यात आलेली आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार, शेट्टी याने २५ एप्रिल २०१७ रोजी कंपनीच्या अधिकाºयांशी संगनमत करून एसबीआयच्या अँटवेर्प शाखेच्या नावे ९ कोटी २३ लाख रुपयांचे दोन बनावट एलओयू जारी केले होते. कंपनीची क्रेडिट मर्यादा उपलब्ध नसताना हे एलओयू जारी करण्यात आले होते. ११० टक्क्यांचे मार्जिनही त्यासाठी पाळले गेले नव्हते.
५० कोटींपेक्षा जास्तीच्या थकीत कर्जाचे अर्जदार आणि हमीदार यांच्या पासपोर्टचा तपशीलही पंतप्रधान कार्यालयाने मागविला आहे. त्यांनाही विदेशी जाण्यापासून रोखण्यात येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
१०० कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम बुडवून देशाबाहेर पळालेल्या आरोपींच्या सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारने नुकतेच एक विधेयक संसदेत सादर केले आहे.
>९१ बड्या थकबाकीदारांना देश सोडण्यास बंदी
नीरव मोदी आणि मेहुल चोकसी हे कर्जबुडवे देश सोडून पळाल्यामुळे अन्य ९१ मोठ्या थकबाकीदारांना देश सोडून जाण्यास बंदी करण्याचा विचार भारत सरकार करीत आहे.
हे सर्व जण मोठमोठ्या कंपन्यांचे संचालक अथवा मालक आहेत. हेतुत: कर्जफेड न करणाºया ४०० कंपन्यांची यादीही सरकारने तयार केली आहे.

Web Title: Another scam in Punjab National Bank, 9 crores illegal loan has been given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.