Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा सन्सच्या अध्यक्षांचा वार्षिक पगार ५५ कोटी

टाटा सन्सच्या अध्यक्षांचा वार्षिक पगार ५५ कोटी

टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या वार्षिक पगारात एक वर्षात तब्बल दुप्पट वाढ झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:14 AM2018-10-23T05:14:33+5:302018-10-23T05:14:35+5:30

टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या वार्षिक पगारात एक वर्षात तब्बल दुप्पट वाढ झाली आहे.

The annual salary for the Tata Sons is 55 crores | टाटा सन्सच्या अध्यक्षांचा वार्षिक पगार ५५ कोटी

टाटा सन्सच्या अध्यक्षांचा वार्षिक पगार ५५ कोटी

मुंबई : टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या वार्षिक पगारात एक वर्षात तब्बल दुप्पट वाढ झाली आहे. चंद्रशेखरन यांना २०१७-१८ मध्ये चक्क ५५.११ कोटी पगार मिळाला. चंद्रशेखरन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक असताना २०१६-१७ मध्ये पगारापोटी त्यांना ३०.१५ कोटी मिळाले होते.
टाटा सन्सचे यापूर्वीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यापेक्षा चंद्रशेखरन यांना मिळालेला पगार तब्बल तीनपट पेक्षा अधिक आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून १६ कोटी वार्षिक पगार मिळत होता. बॉम्बे हाऊसमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार मिस्त्री यांनी कंपनीचा नफा वाढवण्यासाठी आपला पगार मुद्दाम कमी ठेवला होता.

Web Title: The annual salary for the Tata Sons is 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.