Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर?

अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर?

रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:13 AM2019-05-13T03:13:58+5:302019-05-13T03:15:02+5:30

रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे.

America will give India 'Thad' protection system; S-400 is worth 3 billion US dollars? | अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर?

अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर?

वॉशिंग्टन : रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे.
अनेक वर्षांपासून रशियाशी सुरू असलेल्या वाटाघाटींनंतर ही व्यवस्था मिळवण्याच्या जवळ आम्ही असल्याचे भारताने म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काही आठवड्यांपूर्वी ही यंत्रणा देण्याची तयारी दाखवली होती, असे समजते. २०१६ मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या कथित हस्तक्षेपाबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून भारताने त्याच्याकडून वरील व्यवस्था विकत घेतल्यास त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हे आश्वासन अमेरिकेने मागे घेतले. गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत भारत आणि अमेरिकेचे संरक्षण व परराष्ट्रमंत्री यांच्यात समोरासमोर झालेल्या चर्चेत अमेरिकेने रशियाच्या एस-४०० व्यवस्थेसाठी निर्बंध माफ करण्याची तयारी दाखवली, असे समजते; परंतु गेल्या काही आठवड्यांत काही आश्वासने मागे घेण्यात आल्याचे दिसते. नाटोचा सदस्य टर्कीने स्वत:च एस-४०० विकत घेऊ नयेत म्हणून ट्रम्प प्रशासन प्रयत्न करीत असताना हे घडले आहे.

भारत देणार ५.४ अब्ज डॉलर्स
थाड संरक्षण व्यवस्था विकत घेण्याची नेमकी रक्कम किती, हे निश्चित झालेले नाही; परंतु सीएनबीसीच्या वृत्तानुसार प्रत्येक एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर असू शकेल.
सौदी अरेबियाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेशी ४४ थाड लाँचर्स आणि मिसाईल्स १५ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
या तुलनेत भारत पाच एस-४०० साठी ५.४ अब्ज डॉलर्स देणार असल्याचे वृत्त आहे. या प्रत्येक एस-४०० ला आठ लाँचर्स आहेत.

Web Title: America will give India 'Thad' protection system; S-400 is worth 3 billion US dollars?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.