Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 05:05 PM2018-04-04T17:05:23+5:302018-04-04T17:05:23+5:30

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे.

Amazon may offer to buy Flipkart: Report | फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे. खरं तर अॅमेझॉन आणि वॉलमार्ट या दोन्ही अमेरिकन कंपन्या भारतातल्या ई-कॉमर्स क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच अनुषंगानं अॅमेझॉननंही फ्लिपकार्टचे समभाग विकत घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

मिंटच्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टची वॉलमार्टबरोबर भागीदारी होण्याची जास्त शक्यता आहे. तसेच या प्रकरणात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये भागीदारी होणं फारच अवघड आहे. सद्यस्थितीत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा इंडियन ऑनलाइन मार्केटमध्ये दबदबा आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये भागीदारी झालीच तर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात अॅमेझॉनचा एकछत्री अंमल राहणार आहे. अॅमेझॉननं यासंदर्भात काही बोलण्याचं टाळलं आहे. तसेच फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

फ्लिपकार्टमध्ये 40 टक्के भागीदारी विकत घेण्यासंदर्भात वॉलमार्टची चर्चा सुरू आहे. जर असे झालेच तर वॉलमार्टचा परदेशातला हा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. यामुळे वॉलमार्टला भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मॉर्गन स्टॅनली यांच्या मते, इंडियन ई-कॉमर्स मार्केट पुढच्या 10 वर्षांत जवळपास 200 अब्ज डॉलर(130 खर्व रुपये)पर्यंत मजल मारणार आहे.

खरं तर अॅमेझॉनचे कर्मचारी राहिलेल्या सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी 2007मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती. दोघांचीही फ्लिपकार्टमध्ये 40 टक्के भागीदारी आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस हेसुद्धा बन्सल बंधूंनी फ्लिपकार्टची सुरुवात केल्यानंतर अस्वस्थ झाले होते. त्यानंतर फ्लिपकार्टनंही जोरदार प्रगती साधली होती. स्मार्टफोनमध्ये नवनवे सेल देण्यासाठीही फ्लिपकार्ट कंपनी प्रसिद्ध आहे. सध्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये जोरदार प्रतिस्पर्धा सुरू आहे. 

Web Title: Amazon may offer to buy Flipkart: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.