Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलनंतर अॅमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे. सणांचा मुहूर्त साधत कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा सेल सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:34 PM2018-10-30T14:34:39+5:302018-10-30T14:43:37+5:30

फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलनंतर अॅमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे. सणांचा मुहूर्त साधत कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा सेल सुरू केला आहे.

amazon great indian festival sale season 3 starts november 2 deals revealed | Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलनंतर अॅमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे. सणांचा मुहूर्त साधत कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा सेल सुरू केला आहे. सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. 

अॅमेझॉनने 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान Amazon Great Indian Festival सेलचं आयोजन केलं आहे. सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून फर्निचर, कपडे, किचनमधील सामानावर चांगला डिस्काउंट देण्यात आला आहे. विशेषत: स्मार्टफोन्सवर बंपर सूट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक कंपन्याच्या स्मार्टफोनवरही डिस्काउंटसह मोठी कॅशबॅक ऑफर तसेच एक्सेंज ऑफर देण्यात आली आहे. 

अॅमेझॉनवर एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग केल्यास 10 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच 2000 ते 4999 रुपयांपर्यंत वस्तूंची खरेदी केल्यास 5 टक्के अधिक कॅशबॅक तर 5000 रुपयांहून अधिक खरेदी केली असता 10 टक्के अधिक कॅशबॅक मिळणार आहे. वनप्लस 6टी हा स्मार्टफोन या सेलचं मुख्य आकर्षण असू शकतं. 1 नोव्हेंबरपासून याची विक्री सुरू होणार असून यासोबतच अनेक ऑफर्स देण्यात येणार आहे. 

अॅमेझॉन नव्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय आणि पहिल्या ऑर्डरवर फ्री डिलीवरीची ऑफर दिली आहे. 500 रुपयांपेक्षा जास्त रुपयांची खरेदी केली असता बुक माय शो, स्विगी वाऊचर्स आणि अॅमेझॉन पे बॅलेन्स देणार आहे. रेडमी 6 प्रो, सॅमसंग गॅलेक्सी ए8+ आणि रियलमी 1वर आकर्षक डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर्स देण्यात आल्या आहे. याशिवाय लॅपटॉपवर 25,000 रुपये आणि कॅमेऱ्यावर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

Web Title: amazon great indian festival sale season 3 starts november 2 deals revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.