Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 06:08 AM2018-09-27T06:08:38+5:302018-09-27T06:08:53+5:30

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

Air India will re-enter the center, finance minister Jayant Sinha has said | एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

नवी दिल्ली : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. मात्र किती अर्थसाह्य केले जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच जयंत सिन्हा यांनीही या प्रस्तावाविषयी अधिक माहिती दिली नाही.
एअर इंडियाच्या खासगीकरणाचा याआधी प्रस्ताव होता. पण त्याला प्रतिसादच न मिळाल्याने आता पुन्हा अर्थसाह्याचा विचार सुरू आहे. एअर इंडियाच्या डोक्यावर ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातच अलीकडील काळात सातत्याने होत असणारी रुपयाची घसरण आणि इंधनाचे वाढते दर यांमुळे या विमान कंपनीचा तोटा वाढत चालला आहे. इंडियन एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये २00७ साली विलिनीकरण केल्यापासून हा तोटा वाढतच चालला आहे.
सततचा तोटा आणि खासगीकरणाऱ्या प्रस्तावाला मिळू न शकलेला प्रस्ताव यांमुळेच एअर इंडियाला आणखी अर्थसाह्य करण्याशिवाय केंद्राला पर्यायच शिल्लक राहिलेला नाही.

२१00 कोटींची सरकारकडे विनंती

एअर इंडियाने २१00 कोटी रुपये देण्याची विनंती केंद्र सरकारला केली असल्याचे सांगण्यात येते. त्यातून अनेक देणी व कर्जांची परतफेड करता येईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला किती रकमेचे पॅकेज एअर इंडियाला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भारतातील बहुसंख्य विमान कंपन्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत. इंधनाचे वाढते दर हे त्याचे प्रमुख कारण आहे.

Web Title: Air India will re-enter the center, finance minister Jayant Sinha has said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.