Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:52 AM2019-01-04T00:52:15+5:302019-01-04T00:52:32+5:30

एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे.

 Air-India pilots refused to accept lower wages | एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

मुंबई : एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे.
रुंद बॉडी बोइंग विमान व अरुंद बॉडी विमान यांच्या पायलटांच्या वेतनात समानतेसाठी एअर इंडियाने वेतनात सुधारणेचा निर्णय घेतला. रुंद बॉडी पायलटांचे प्रतिनिधित्व करणाºया इंडियन पायलट गिल्डने (आयपीजी) यास विरोध करीत एअर इंडियाच्या व्यवस्थापनास नोटीस पाठविली आहे. कामगार आयुक्त दोन्ही पक्षांना बोलावून समेटाचा प्रयत्न करणार आहेत. आयपीजीचा एक पायलट म्हणाला की, हा निर्णय म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे.
२०१२ मध्ये सरकारच्या एका पॅनलने सर्व पायलटांच्या वेतनाची पुनर्रचना केली होती. त्यावर २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. जून २०१६ मध्ये अरुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी नव्या वेतनाचा स्वीकार केला. रुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी मात्र नव्या वेतनास नकार दिला. आपले वेतन २५ टक्क्यांनी कमी होईल, असे संघटनेने म्हटले होते.

काहींना ४0 टक्के वाढ
त्यानंतर अरुंद बॉडी विमान पायलटांचे वेतन २०१६ च्या करारानुसार दिले जात होते. रुंद बॉडी विमान पायलटांना मात्र जुनेच वेतन दिले जात होते. २०१७ मध्ये आयपीजीने सुधारित वेतन संरचनेस मान्यता दिली. पण नागरी उड्डयन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१८ मध्ये ती फेटाळून लावली होती.

Web Title:  Air-India pilots refused to accept lower wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.