Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 08:36 AM2019-02-02T08:36:58+5:302019-02-02T08:49:12+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला.

after the decision of the modi government the banks will come up in the bumper jobs | मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

Highlightsगोयल यांनी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांमुळे आता मोठी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी आणखी आठ बँकांना पीसीएतून बाहेर काढण्याचे सूतोवाच केले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या बँका स्वतःच्या शाखा वाढवू शकणार आहेत.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांमुळे आता मोठी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी आणखी आठ बँकांना पीसीएतून बाहेर काढण्याचे सूतोवाच केले आहेत. 

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या बँका स्वतःच्या शाखा वाढवू शकणार आहेत. बँकांनी शाखा वाढवल्यास बंपर नोकरभरती करण्यात येणार असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, आरबीआयनं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला पीसीए (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन)मधून बाहेर ठेवलं आहे. आता आणखी काही बँकांना आम्ही पीसीएतून बाहेर काढणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं होतं. या सरकारी बँकांना आरबीआयनं पीसीए(प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन)मध्ये ठेवलं होतं. पीएसीएमध्ये सहभागी असलेल्या बँकांची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत या बँका कोणतंही मोठं कर्ज देऊ शकत नाहीत. या बँकांना पीसीएतून बाहेर काढल्यानं ग्राहकांवर कोणताही सरळ परिणाम होणार नाही. परंतु या बँकांना स्वतःच्या शाखा वाढवण्यास मदत मिळणार आहे. 

तसेच या बँका नव्या निर्माण करण्यात येणाऱ्या शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी नव्या भरती करतील. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कोणत्याही बँकेला पीसीएमध्ये ठेवल्यास त्याची ग्राहकांना चिंता करण्याची आवश्यकता नसते. कारण आरबीआयनं काही मानकांच्या आधारावर बँकांच्या वित्तीच्या स्थितीत सुधार होण्यासाठी पीसीए हा फ्रेमवर्क तयार केला आहे. जेणेकरून बँक आपल्या निधीचा योग्य वापर करून संभाव्य धोक्यातून बाहेर पडू शकेल.  

Web Title: after the decision of the modi government the banks will come up in the bumper jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.