Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी

भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी

सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला. हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या वर गेली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:50 AM2018-01-08T00:50:21+5:302018-01-08T00:50:45+5:30

सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला. हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या वर गेली आहे.

 9.54 crore telecom operators in India, highest 83 lakh in November; Maharashtra second place | भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी

भारतात ९७.५४ कोटी दूरध्वनीधारक, सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात; महाराष्ट्र दुस-या स्थानी

मुंबई : भारतातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७.५४ कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षी सर्वाधिक ८३ लाखांची वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली. सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (सीओएआय) या संबंधीचा अहवाल सादर केला आहे.
भारतात शौचालयांपेक्षा मोबाइल अधिक असल्याचा विषय अनेकदा चर्चीला गेला. यावर सीओएआयच्या अहवालामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाले.
सीओएआयने या अहवालात मोबाइल आणि लँडलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धारकांचा अभ्यास केला. हे दोन्ही मिळून देशातील दूरध्वनीधारकांची संख्या ९७ कोटींच्या वर गेली आहे. यामध्ये एअरटेलचा हिस्सा सर्वाधिक २९.६८ टक्के आहे.
रिलायन्स जिओने अल्पावधितच १४.९६ टक्के बाजारी हिस्स्याची मजल मारली आहे, तर सरकारी बीएसएनएल आणि एमटीएनएलचा बाजारी हिस्सा एक टक्क्यांच्या खाली आहे.
फक्त मोबाइलधारकांचा विचार केल्यास, पूर्व उत्तर प्रदेश मंडळ यात अव्वल राहिले आहे.
देशातील एकूण मोबाइलधारकांपैकी ८.४९ कोटी धारक हे या मंडळातील आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर दुसरा असून, महाराष्ट्र (मुंबई वगळून) मंडळात ८.१५ कोटी मोबाइलधारक आहेत.
टेलिकॉम हे देशाच्या सर्वसमावेश आर्थिक विकासाचे क्षेत्र आहे. प्रत्येकाचा यांत सहभाग असल्याने प्रत्येक दूरध्वनी अथवा मोबाइलधारक हा अप्रत्यक्षपणे या आर्थिक विकासाचा वाटेकरी ठरतो. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला दूरवर पोहोचविण्यात मोबाइलची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या काळातही टेलिकॉम उद्योग यासाठी कटिबद्ध असेल, असे मत सीओएआयचे महासंचालक रंजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले.

Web Title:  9.54 crore telecom operators in India, highest 83 lakh in November; Maharashtra second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल