Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीतून राज्याला ५२ हजार कोटी

जीएसटीतून राज्याला ५२ हजार कोटी

जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच, गेल्या वर्षभरात सरकारची तिजोरी २८ टक्के अधिक कर उत्पन्नाने भरली असल्याची आकडेवारी समोर आली आहे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:59 AM2018-06-30T02:59:38+5:302018-06-30T03:01:05+5:30

जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच, गेल्या वर्षभरात सरकारची तिजोरी २८ टक्के अधिक कर उत्पन्नाने भरली असल्याची आकडेवारी समोर आली आहे,

52 thousand crores from GST | जीएसटीतून राज्याला ५२ हजार कोटी

जीएसटीतून राज्याला ५२ हजार कोटी

चिन्मय काळे  
मुंबई : जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच, गेल्या वर्षभरात सरकारची तिजोरी २८ टक्के अधिक कर उत्पन्नाने भरली असल्याची आकडेवारी समोर आली आहे, पण जीएसटीपेक्षा व्हॅटमधून मिळणारे उत्पन्नच अद्याप अधिक आहे.
देशात जीएसटी १ जुलै २०१७ ला लागू झाला. जीएसटी लागू झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेलसह मद्य व अन्य १० वस्तुंवरील व्हॅट कायम आहे. वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढते असल्याने, त्यावरील भरमसाठ व्हॅट राज्य सरकारला मिळाला आहे. हा व्हॅट व जीएसटी मिळून २०१७-१८ मध्ये राज्याच्या तिजोरीत १.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, पण व्हॅट वगळल्यास निव्वळ जीएसटीचा ९ महिन्यांचा महसूल ५२ हजार ३८६ कोटी रुपये आहे. त्यानुसार, १२ महिन्यांचा जीएसटी महसूल फक्त ६९ हजार ७७७ कोटी रुपये होतो.
जीएसटी आल्यानंतर करमणूक कर, मनोरंजन कर, प्रवेश कर, ऊस खरेदी कर व राज्य सरकार वसुली करीत असलेला केंद्रीय विक्री कर हे कर संपुष्टात आले. अनेक वस्तुंवरील व्हॅटची जागा जीएसटीने घेतली. संपुष्टात आलेल्या या करांच्या माध्यमातून २०१६-१७ मध्ये ७,५०९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला होता.
त्या वर्षीचा राज्याचा एकूण कर महसूल ९० हजार ५२५ कोटी रुपये होता. त्यातून ७,५०९ कोटी रुपये हा आकडा वगळल्यास २०१७-१८ मध्ये जीएसटीमार्फत गोळा झालेला ५२ हजार ३८६ कोटी रुपये हा आकडा कमी आहे.
जीएसटीच्या पहिल्या वर्षात (२०१७-१८) मध्ये राज्याचा एकूण कर महसुुलात २८ टक्के वाढ दिसते, पण व्हॅट वगळून उर्वरित आकड्यांची गोळा-बेरीज केल्यास वास्तवात जीएसटीचा महसूल कमी आहे.

५ वर्षांतील कर वसुली (कोटी रुपयात)
वर्ष वसुली वाढ
२०१३-१४ ६९,७७७ ७ टक्के
२०१४-१५ ७५,७८३ ८ टक्के
२०१५-१६ ७९,१२४ ४ टक्के
२०१६-१७ ९०,५२५ १४ टक्के
२०१७-१८ ६१,४३६ (व्हॅट)
२०१७-१८* ५२,३८६ (जीएसटी)
(*९ महिन्यांची आकडेवारी)
 

Web Title: 52 thousand crores from GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी