५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:39am

एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत.

वॉशिंग्टन - एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत. अमेरिकेतील ५ लाख कुशल भारतीय कर्मचाºयांना नाइलाजाने मायदेशी परतावे लागेल. ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार अंतर्गत सुरक्षा विभागाने एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याविषयी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे. एच-१ बी व्हिसाची तीन वर्षांची मुदत आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्याची सध्याच्या कायद्यात तरतूद आहे. मात्र ही सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही ज्यांच्या ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या अर्जावर निर्णय न झालेल्यांच्या एच-१बी व्हिसाची मुदत अर्ज निकाली निघेपर्यंत वाढविण्याची मुभा कायद्यानेच दिलेली आहे. (वृत्तसंस्था) भारतीयांबरोबरच चिनीही असंख्य ग्रीन कार्ड संदर्भातील ज्यांच्या अर्जांवर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही अशा अर्जदारांमध्ये भारतीय व चिनी लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सलग १० ते १२ वर्षे अमेरिकेत आहेत. ‘एच-१बी’ची मुदत न वाढविण्याचा निर्णय अंमलात आल्यास या सर्वांना परतावे लागेल.  

संबंधित

इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस, श्रीलंकाही एक पाऊल पुढे
अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?
दहशतवादविरोधी सरावात सहभागी होणार भारत-पाक
नागालँडचा 'हा' डॉक्टर होता भारतीय फूटबॉल संघाचा पहिला कर्णधार
खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात

व्यापार कडून आणखी

डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डरच्या नियमात मोठा बदल; काळा पैसा रोखण्यासाठी RBIचं पाऊल
व्याजदरात पुन्हा वाढ?, महागाई आणखी वाढण्याची भीती
इराण देणार भारताला सवलती, तेलाबाबत लवचिक धोरण
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे राज्यांची वित्तीय स्थिती बिघडली
अबब... १०० अब्ज डॉलर; 'टाटा'नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला इतिहास

आणखी वाचा