lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:39 AM2018-01-04T00:39:55+5:302018-01-04T00:40:06+5:30

एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत.

 5 lakh Indians will have to return, proposal of the Trump administration; The possibility of 'H-1B' may not increase | ५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

वॉशिंग्टन - एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत. अमेरिकेतील ५ लाख कुशल भारतीय कर्मचाºयांना नाइलाजाने मायदेशी परतावे लागेल.
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार अंतर्गत सुरक्षा विभागाने एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याविषयी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे.
एच-१ बी व्हिसाची तीन वर्षांची मुदत आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्याची सध्याच्या कायद्यात तरतूद आहे. मात्र ही सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही ज्यांच्या ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या अर्जावर निर्णय न झालेल्यांच्या एच-१बी व्हिसाची मुदत अर्ज निकाली निघेपर्यंत वाढविण्याची मुभा कायद्यानेच दिलेली आहे. (वृत्तसंस्था)

भारतीयांबरोबरच चिनीही असंख्य

ग्रीन कार्ड संदर्भातील ज्यांच्या अर्जांवर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही अशा अर्जदारांमध्ये भारतीय व चिनी लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सलग १० ते १२ वर्षे अमेरिकेत आहेत. ‘एच-१बी’ची मुदत न वाढविण्याचा निर्णय अंमलात आल्यास या सर्वांना परतावे लागेल.
 

Web Title:  5 lakh Indians will have to return, proposal of the Trump administration; The possibility of 'H-1B' may not increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.