lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४२ हजार कोटींचा जीएसटी केवळ ५० दिवसांत मिळाला, पहिले मासिक रिटर्न भरण्याचे काम सुरु

४२ हजार कोटींचा जीएसटी केवळ ५० दिवसांत मिळाला, पहिले मासिक रिटर्न भरण्याचे काम सुरु

देशभरात १ जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत व्यापा-यांनी या करापोटी एकूण ४२ हजार कोटी रुपयांचा भरणा सरकारी तिजोरीत केल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:55 AM2017-08-22T00:55:32+5:302017-08-22T00:55:37+5:30

देशभरात १ जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत व्यापा-यांनी या करापोटी एकूण ४२ हजार कोटी रुपयांचा भरणा सरकारी तिजोरीत केल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

42 thousand crores of GST got in only 50 days, the first monthly return work started | ४२ हजार कोटींचा जीएसटी केवळ ५० दिवसांत मिळाला, पहिले मासिक रिटर्न भरण्याचे काम सुरु

४२ हजार कोटींचा जीएसटी केवळ ५० दिवसांत मिळाला, पहिले मासिक रिटर्न भरण्याचे काम सुरु

नवी दिल्ली: देशभरात १ जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत व्यापा-यांनी या करापोटी एकूण ४२ हजार कोटी रुपयांचा भरणा सरकारी तिजोरीत केल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
‘जीएसटी’चे पहिले मासिक रिटर्न भरण्याचे काम सुरु असून त्याची वाढीव मुदत २५ आॅगस्टपर्यंत आहे. आतापर्यंत दाखल केल्या गेलेल्या रिटर्नच्या हवाल्याने या अधिकायाने ही माहिती दिली.
रिटर्नस्चा आढावा घेतल्यास असे दिसते की, जमा झालेल्या ४२ हजार कोटी रुपयांपैकी १५ हजार कोटी रुपये आंतर-राज्य व्यापारावरील ‘इंटेग्रेटेट जीएसटी’पोटी आहेत तर पाच हजार कोटी महागड्या मोटारी व तंबाखू यासारख्या अप्रोत्साहित वस्तूंवरील कराचे आहेत. राहिलेला २२ हजार कोटींचा कर केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी म्हणून भरला गेला असून ही रक्कम केंद्र व राज्यांमध्ये वाटली जाईल. या नव्या करप्राणालीचे चांगले पालन होत असल्याचे सांगून हा अधिकारी म्हणाला की, नोंदणी केलेल्या एकूण ७२ लाख व्यापाºयांपैकी १० लाख करदात्यांनी रिटर्न भरले आहेत.

Web Title: 42 thousand crores of GST got in only 50 days, the first monthly return work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.