Lokmat Money > बिझनेस न्यूज > नक्षलग्रस्त भागांत ४ हजार मोबाइल टॉवर्स

नक्षलग्रस्त भागांत ४ हजार मोबाइल टॉवर्स

महाराष्ट्रासह १० राज्यांमधील नक्षलग्रस्त भागात ४ हजार मोबाइल टॉवर्स पुढील ११ महिन्यांत उभारले जातील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:31 PM2018-05-18T23:31:06+5:302018-05-18T23:31:06+5:30

महाराष्ट्रासह १० राज्यांमधील नक्षलग्रस्त भागात ४ हजार मोबाइल टॉवर्स पुढील ११ महिन्यांत उभारले जातील.

4 thousand mobile towers in Naxal-affected areas | नक्षलग्रस्त भागांत ४ हजार मोबाइल टॉवर्स

नक्षलग्रस्त भागांत ४ हजार मोबाइल टॉवर्स

- चिन्मय काळे
मुंबई : महाराष्ट्रासह १० राज्यांमधील नक्षलग्रस्त भागात ४ हजार मोबाइल टॉवर्स पुढील ११ महिन्यांत उभारले जातील. आजवर कुठलीच मोबाइल कंपनी पोहोचू न शकलेल्या भागात बीएसएनएल नेटवर्क उभे करेल, अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. ब्रॉडबँड इंडिया फोरम व दूरसंचार मंत्रालयाच्या ‘५जी’ आंतरराष्टÑीय परिषदेच्या निमित्ताने त्यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, नक्षलग्रस्त भाग व ईशान्येकडील राज्यांसाठी बीएसएनएलने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात २,४०० मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले. आता ४ हजार टॉवर्सचा दुसरा टप्पा या वर्षात पूर्ण केला जाईल. ‘भारतनेट’ उपक्रमात पहिल्या टप्प्यात १ लाख ग्राम पंचायती फायबर आॅप्टिक नेटवर्कने जोडण्यात आल्या. त्यापैकी ९० टक्के नेटवर्क बीएसएनएलचे होते. आता दुसऱ्या टप्प्यातील १.५० लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल.
‘भारतनेट’मुळे ग्रामीण भागात जलद इंटरनेट सेवा पोहोचत असून, २०२० पर्यंत त्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
>स्पर्धेमुळे नोकरी गेल्यास सहकार्य
दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा व अत्याधुनिकीकरणामुळे नोकरी गेल्यास, पर्यायी नोकरी मिळवून देण्यासाठी सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी या वेळी दिले. या क्षेत्रातील सुमारे ९० हजार नोकºया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे, पण सरकार आधी मोबाइल क्षेत्रात स्थिरपणा आणण्याचा प्रयत्न करतेय. तसे धोरणही लवकरच येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 4 thousand mobile towers in Naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल