शेगावात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:15 PM2019-03-23T13:15:58+5:302019-03-23T13:16:02+5:30

शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे.

Youth murder in love affair in Shegaon | शेगावात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून 

शेगावात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. 
अक्षय अशोक वानखडे वय 22 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यास तिघांनी छातीत व पोटावर चाकूने वार करून भोसकले. मृतकाचा मोठा भाऊ आशिष याने काही दिवसांपूर्वी एका मुलीस पळवून नेले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान शुक्रवारी राग मनात धरून अक्षय ला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मृतक मुलाचे आईने शहर पो स्टे ला दिली. त्यावरून ठाणेदार सुनील हुड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी युवकाचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी भारत शेगोकार यास चाकूसह अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस रात्री घेत होते. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Youth murder in love affair in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.