तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तब्बल 4 तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 10:13 PM2019-03-21T22:13:53+5:302019-03-21T22:14:30+5:30

लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय 33 वर्ष रा. स्टेशन रोड मलकापूर हे नातेवाईक मित्रमंडळींच्या परिवारासह दुपारी नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदिरावर दर्शनाकरिता गेले होते.

The youth drowned in the water, after 4 hours the bodies were out of water | तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तब्बल 4 तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर  

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तब्बल 4 तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर  

Next

मलकापूर : पूर्णा नदी पात्रात आंघोळ करीत असताना एका 33 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 21 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली. नरवेल परिसरातील कोटेश्वर येथे हा दुर्दैवी अपघात झाला.

लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय 33 वर्ष रा. स्टेशन रोड मलकापूर हे नातेवाईक मित्रमंडळींच्या  परिवारासह दुपारी नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदिरावर दर्शनाकरिता गेले होते. दर्शन घेतल्यानंतर समोरच असलेल्या पूर्णा नदी पात्रात ही सर्व मंडळी आंघोळ करीत होती. दरम्यान राजकुमार वर्मा हे कुणाला कळण्याआधीच पाण्यात बुडाले. ही बाब लक्षात येताच काही सहकारी मंडळींनी तात्काळ पाण्यात उड्या घेऊन त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाही. गोताखोर चमूनेसुद्धा शोध मोहीम राबविली. तब्बल चार तास शोध मोहीम राबविल्यानंतर राजकुमार वर्मा यांना मृतावस्थेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटना कळताच घटनास्थळी शहरातील नेते मंडळी, पत्रकार व स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली.  तर आमदार चैनसुख संचेती यांनी मृतकाचे प्रेत आपल्या स्वतःच्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालय कडे आणले. मृत्युमुखी पडलेले राजकुमार वर्मा यांचा धाकटा भाऊ विजय वर्मा सुद्धा पत्रकार असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक 6 वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलगा आहे. या दुर्दैवी घटनेने वर्मा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: The youth drowned in the water, after 4 hours the bodies were out of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.