क्रेनखाली आल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:43 PM2019-01-15T12:43:22+5:302019-01-15T12:43:48+5:30

खामगाव: उभी असलेली क्रेन मागे घेत असताना क्रेनखाली येवून एका ३२ युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली.

youth died in an accident at Khamgaon | क्रेनखाली आल्याने युवकाचा मृत्यू

क्रेनखाली आल्याने युवकाचा मृत्यू

Next


खामगाव: उभी असलेली क्रेन मागे घेत असताना क्रेनखाली येवून एका ३२ युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अमरावतील येथील गणेश लड्डू सावरकर हा ३२ वर्षीय युवक बाळापूर बायपासवर एका हॉटेलसमोर प्रवाशी वाहनाची प्रतिक्षा करीत उभा होता. यावेळी या परिसरात उभी असलेली क्रेन चालकाने मागे घेण्याचा प्रयत्न केला. या क्रेनचा धक्का लागल्याने युवक खाली पडला. यानंतर क्षणात युवक क्रेनखाली आला. यात डोक्याला जबर मार लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा युवक नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी सोमवारी खामगाव येथे आला होता. यानंतर मंगळवारी सकाळी परतत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: youth died in an accident at Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.