Water supply collapses! | पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले! 
पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले! 

खामगाव: गेरू  माटरगाव येथील धरणावरील पंपींग वारंवार खंडीत होत असल्याने, शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे. जॅकवेलमध्ये पाण्याचा संचय होत नसल्याने, नागरिकांना तब्बल १३ दिवसापर्यंत पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 
शुक्रवारी धरणावरील जॅकवेलमध्ये जलसंचय न झाल्याने, धरणावरील पंपींग वारंवार प्रभावित झाले. तब्बल तीन वेळा पंपीग करूनही अपेक्षीत जल संचन न झाल्यामुळे  केला नगर, राम मंदिर, मुक्तानंद नगर, डी.पी.रोड यासह शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठा खंडीत आहे. अपेक्षीत जलसंचय होईपर्यंत शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 
दरम्यान, एकाच महिन्यात वारंवार पाणी पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. विलंबाच्या पाणी पुरवठ्यावरून नगर पालिका प्रशासन आणि नागरिकांचे वारंवार खटकेही उडत असल्याचे दिसून येते.

१३ व्या दिवशीही पाणी नाही!
तांत्रिक अडचणीमुळे खामगाव पालिका प्रशासनाकडून सलग अकराव्या दिवशी पाणी पुरवठा होवू शकला नाही. शनिवारी देखील काही भागात पाणी पुरवठा होवू शकणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारी पहाटे पंपींग सुरू करण्यात आले. मात्र, जॅकवेलमध्ये जलसंचय न झाल्याने सकाळी ९:३० वाजता पहिल्यांदा पंप बंद पडला. त्यानंतर ११ वाजता पुन्हा एकदा पंपीग करण्यात आले. परंतु, दुपारी १ वाजता पंपीग बंद पडले. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून दुपारी २ वाजता पंपीग सुरू केले. मात्र, दुपारी ४:३० वाजता जॅलवेलमध्ये जलसंचय न झाल्याने, तिसºयांदाही पंपीग बंद पडले. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा आता प्रभावित झाला आहे.


Web Title: Water supply collapses!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.