‘बीएलओ’धारकांची असमाधानकारक कामगिरी; कारणे दाखवा नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:11 AM2018-04-24T01:11:23+5:302018-04-24T01:11:23+5:30

मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघातीच्या मतदार यादीमध्ये रंगीत छायाचित्र टाकण्याबाबतचे काम बीएलओ मार्फत करण्यात येत आहे; मात्र बीएलओकडून होणारे काम असमाधानकारक असल्याचे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित बीएलओवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सहायक मतदार नोंदणी अधिकारी मेहकर यांनी २१ एप्रिल रोजी दिल्या आहेत.

'Unsatisfactory performance of BLOs; Show reasons to show cause! | ‘बीएलओ’धारकांची असमाधानकारक कामगिरी; कारणे दाखवा नोटीस!

‘बीएलओ’धारकांची असमाधानकारक कामगिरी; कारणे दाखवा नोटीस!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बीएलओ’वर निलंबनाच्या कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघातीच्या मतदार यादीमध्ये रंगीत छायाचित्र टाकण्याबाबतचे काम बीएलओ मार्फत करण्यात येत आहे; मात्र बीएलओकडून होणारे काम असमाधानकारक असल्याचे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित बीएलओवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सहायक मतदार नोंदणी अधिकारी मेहकर यांनी २१ एप्रिल रोजी दिल्या आहेत.
मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये १00 टक्के रंगीत छायाचित्र टाकण्याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. १ जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित १0 जानेवारी २0१८ रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये छायाचित्र उपलब्ध नसलेले छायाचित्र कृष्णधवल स्वरूपात आहे.
 अशा मतदारांची रंगीत छायाचित्र प्राप्त करून घेऊन मतदार यादीमध्ये टाकण्यासंदर्भात विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बीएलओ यांनी मतदारांच्या घरी जाऊन रंगीत फोटो जमा करणे, मयत व स्थलांतरीत मतदारांचे नाव कमी करणे, मतदार यादी शुद्धीकरण करणे आदी कामे करण्यासंदर्भात बीएलओ यांना निवडणूक कार्यालयाकडून सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र बीएलओ यांनी पाहिजे त्या प्रमाणात आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. 
त्यामुळे नायगाव देशमुख, घाटबोरी, पारखेड, दृगबोरी, हिवरा खुर्द, कळंबेश्‍वर विठ्ठलवाडी, पेनटाकळी, पिंपळगाव उंडा, शिवाजी नगर, भालेगाव, शेंदला, मोळा, गोहोगाव, डोणगाव, शहापूर, पिंप्रीमाळी, देउळगाव माळी, वडगाव माळी, वरदडी, मेहकर, बरटाळा, परतापूर, सोनाटी, बोरी या गावातील बीएलओचे काम करणार्‍या ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई, कनिष्ठ लिपिक,फिल्टर अटेंडट, निमतानदार -२, तलाठी, कोतवाल आदी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांना कारणे दाखवा नोटीस मिळाली असेल अशा बीएलओ यांनी २५ एप्रिल २0१८ रोजी सकाळी ११ वाजता स्वत: उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे समक्ष हजर राहून आपला खुलासा सादर करावा. 
या दिवशी गैरहजर राहिल्यास अथवा आपला खुलासा असमाधानकारक वाटल्यास संब्ांधित बीएलओ विरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी मेहकर यांनी २१ एप्रिल रोजी कळविले आहे. 

बीएलओच्या हलगर्जीमुळे मतदार राहणार वंचित! 
निवडणूक कार्यालयाच्या निर्देशानुसार मेहकर मतदारसंघात निवडणूक मतदार यादीचे शुद्धीकरण करणे, मतदारांना रंगीत छायाचित्र असलेले मतदान कार्ड देणे, मयत अथवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे आदी कार्यक्रम मेहकर निवडणूक कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम बीएलओ यांच्याकडे दिलेले आहे; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बीएलओ आपल्या कामात कुचराई व हलगर्जी करीत आहे. त्यामुळे मतदारवर्ग येणार्‍या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार याद्या शुद्धीकरण कामात हलगर्जी करणार्‍या बीएलओवर ठोस कारवाई व्हावी,अशी मागणी मतदार वर्गातून होत आहे.

Web Title: 'Unsatisfactory performance of BLOs; Show reasons to show cause!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mehkarमेहकर