पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:29 PM2018-10-22T16:29:05+5:302018-10-22T16:29:35+5:30

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

unemployed youth suicide in Palshi Jhansi | पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

googlenewsNext

संग्रामपूर :  संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी युवकाने चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली. शासकीय व्यवस्थेचा आपण बळी ठरत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पळशी शिवारातील एका  शेताच्या धु-यावरील निंबाच्या झाडाला सागर दिनकर वाघ (वय २४) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव घाटे यांनी तामगाव पोलीस स्टेशनला दिली असता ठाणेदार डी.बी. इंगळे, तहसिलदार भूषण अहिरे यांच्यासह तलाठी कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतकाच्या खिशात चारपानी चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये सागरने शासन कुचकामी ठरले असल्याचा उल्लेख करीत ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या असल्याचे नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व निकष पुर्ण करून सुध्दा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. एकीकडे शासनाकडून मुद्रा लोनवर बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्याची आकडेवारी देवून शासन स्वत: पाठ स्वत:ची थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मुद्रा लोनसाठी बँक प्रशासन बेरोजगारांची अडवणूक करीत आहे, सागर सोबतही असेच घडले.

संग्रामपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्र मधील बँक व्यवस्थापनाने सतत दोन वर्षे मुद्रा लोनसाठी सागरला बँकेचे उंबरठे झिजवायला लावले. परंतु लोन काही मिळाले नाही. या सर्व बाबींचा उल्लेख सागरने चिठठीत केला आहे. माझ्या मृत्यूनंत कुटूंबाला ५ लाख रूपयाची मदत द्यावी, तो पर्यंत माझे शव ताब्यात घेऊ नये, असेही चिठठीत नमुद असल्याने गावक-यांनी सागरचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारपर्यंत शव तहसील कार्याल्यातच होते. सागर हा उच्चशिक्षित होता त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. मात्र बेरोजगारी पुढे हतबल झाला. सागरच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ आहेत. सागरने चिठ्ठीत आई-वडील व भावांना धीर देत शेजारी व नातेवाईकांना त्यांच्याकडे लक्ष देण्याचे नमूद केले. 

Web Title: unemployed youth suicide in Palshi Jhansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.