स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समितीद्वारे होणार मूल्यांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:13 AM2018-01-25T00:13:52+5:302018-01-25T00:14:06+5:30

चिखली : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ कार्यक्रमाला शहरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून, या अभियानाची यशस्वीता ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असल्याने शहरवासीयांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Under the Clean India Campaign, the Central Committee will evaluate! | स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समितीद्वारे होणार मूल्यांकन!

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समितीद्वारे होणार मूल्यांकन!

Next
ठळक मुद्देस्वच्छ चिखलीसाठी पालिका प्रशासन प्रयत्नरत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ कार्यक्रमाला शहरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून, या अभियानाची यशस्वीता ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असल्याने शहरवासीयांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने देशभरातील सर्व शहरे आणि गावांचे स्वच्छतेच्यादृष्टीने मूल्यांकन करण्यासाठी ३१ जुलै २0१७ रोजी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानात सहभागी चिखली शहराचे स्वच्छतेबाबत लवकरच मूल्यांकन होणार असून, शहरातील स्वच्छतेची पाहणी एका समितीद्वारे होणार आहे. या पृष्ठभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केल्या जात आहेत. 
यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, पाहणीसाठी येणार्‍या समितीद्वारे नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असल्याने पालिका प्रशासनाने चिखली शहर स्वच्छ व सुंदर असल्याचा दावा करीत या सर्वेक्षणांतर्गत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाहणीसाठी येणार समितीद्वारे शहराच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबतही पालिका प्रशासनाने खुलासा केला असून, या प्रश्नावलीनुसार आपले चिखली शहर या स्पर्धेत सहभागी असल्याची माहिती आपणास आहे का, मागील वर्षाच्या तुलनेत आपले शहर हे स्वच्छ आहे का, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीचा वापर आपण करता का, घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळया डब्यांमधून गोळा करण्याच्या व्यवस्थेबाबत आपण समाधानी आहात का, मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील शौचालयाचे आणि मुतारीचे प्रमाण वाढलेले आहे का, शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ आहेत का, आदी प्रश्न नागरीकांना विचारल्या जाणार असल्याने या प्रश्नांना नागरिकांनी सर्मपक उत्तरे देऊन पालिका प्रशासनास सहकार्य करावे, या हेतूने पालिका प्रशानाकडून नागरिकांना या प्रश्नावलीसोबतच पालिकेस अपेक्षित उत्तरांचा सोशल मीडियाद्वारे प्रसार करण्यासह या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले जात आहे. 

मोबाइल अँपद्वारे करा स्वच्छतेच्या तक्रारी
चिखली नगर परिषदेच्या आरोग्य सेवाविषयक (साफसफाई) काही तक्रारी नोंदवायच्या असल्यास शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेले मोबाइल अप्लिकेशन चिखली नगर परिषदेने अंगीकृत केलेले आहे. या मोबाइल अँपचा वापर शहरवासीयांनी करावा व स्वच्छताविषयक कोणतीही तक्रार असल्यास या मोबाइल अँपच्या माध्यमाने ‘रियल टाइम डाटा’, फोटो कॉपीसह तक्रार नोंदविल्यास तक्रारीचे तत्काळ समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न आरोग्य विभाग नगर परिषद चिखलीद्वारे केला जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.

जनतेने सहकार्य करावे -प्रिया बोंद्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारताचे स्वप्नपूर्तीसाठी स्वच्छता अभियानांतर्गत शासकीय, निमशासकीय, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेत देशपातळीवर शहराचा नावलौकिक वाढावा, यासाठी नगर परिषद राबवित असलेल्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासह सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांनी केले आहे.

Web Title: Under the Clean India Campaign, the Central Committee will evaluate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.