अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 05:05 PM2019-01-23T17:05:59+5:302019-01-23T17:06:16+5:30

मानेगाव: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.

Two killed in an accident near manegaon | अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार 

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार 

Next

मानेगाव: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. नांदुरा मार्गावर पुर्णा नदी पुलाजवळ  २३ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.
कंडारी-भंडारी ता.खामगाव येथील अनंता चोपडे हे दुचाकीने पत्नी व मुलासह पळशी सुपो येथे जात होते. त्यांच्या दुचाकीला पुर्णा  नदी पुल व मानेगाव फाट्यादरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात अनंता चोपडे यांच्या पत्नी शारदा चोपडे (वय ३२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनंता चोपडे व त्यांचा मुलगा हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरीकांनी जखमींना रुग्णालयात पोहचविण्यास मदत केली. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील एका खासगी रुग्णाालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना, अनंता चोपडे यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलावर उपचार करण्यात येत आहे. (वार्ताहर

Web Title: Two killed in an accident near manegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.