कर्जाच्या तणावामुळे बुलडाणा जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 AM2018-01-18T00:24:57+5:302018-01-18T00:27:43+5:30

जानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Two farmer suicides in Buldana district because of debt stress | कर्जाच्या तणावामुळे बुलडाणा जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या!

कर्जाच्या तणावामुळे बुलडाणा जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या!

Next
ठळक मुद्देजानेफळ येथील गणेश गंगाधर सवडतकर यांनी कीटकनाशक प्राशन केलेधामणगाव बढे येथील रमा बाबुराव म्हस्के यांनी राहत्या घरी घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील गणेश गंगाधर सवडतकर (वय ४४) या  शेतकर्‍याकडे ४ एकर शेती असून, त्यांच्याकडे स्टेट बँक शाखा जानेफळचे  ९0 हजार रुपये कर्ज आहे. त्यामुळे ते तणावात होते. दरम्यान, १४ जानेवारी  रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा  प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात भरती  करण्यात आलेले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात  वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. मोताळा तालुक्या तील धामगणाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम वाडी रिधोरा  येथील  रमा बाबुराव म्हस्के (वय ५0) या शेतकर्‍याने स्वत:च्या राहत्या घरी दोरीच्या  साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी  सकाळी उघडकीस आली. या घटनेची फिर्याद संदीप अशोक म्हस्के (वय ३३)  रा. वाडी यांनी धामणगाव बढे पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळाचा  पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

Web Title: Two farmer suicides in Buldana district because of debt stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.