ठळक मुद्देगुन्हा दाखल वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी मारहाणीच्या निषेधार्थ  सुमारे १०० अधिकारी-कर्मचाºयांच्या जमावाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर धडक दिली. याप्रकरणी मारहाण करणाºया ग्राहकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून महावितरणकडून त्याचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.
सध्या महावितरण कंपनीकडून खामगाव शहर व ग्रामीण परिसरात थकीत विद्युत बिल वसुलीची विशेष धडक मोहीम सुरु आहे. यामध्ये विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांचे पथक बनवून वसुली करण्यात येत आहे. दरम्यान येथील दाळफ ैल भागातील रहिवाशी राजू सहारकर या ग्राहकाकडे मार्च २०१६ पासूनचे घरगुती वापराचे १७ हजार रुपयांचे वीज बिल थकलेले असल्याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हे पथक सहारकर यांच्याकडे गेले. यावेळी सहारकर याने चिडून जावून पथकातील शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश माहुरकर व फरशी वितरण केंद्राचे प्रभारी सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम शित्रे यांना दमदाटी करित मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच महावितरणचे सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी एकत्र येवून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धडक दिली. यावेळी ठाणेदार संतोष ताले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तर पुरुषोत्तम शित्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजू सहारकर याच्याविरुध्द भादंवि कलम ३५३, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान महावितरणच्या पथकाने रात्री ७.३० वाजताच्या सुमारास दाळफ ैलात जावून सहारकर याच्या घरचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडित केला.