खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:53 PM2019-06-24T12:53:13+5:302019-06-24T12:53:30+5:30

खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल.

Two-day survey of homeless people in Khamgaon | खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील बेघर आणि निराधारांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेघर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल.
खामगाव शहरातील फुटपाथ, विविध चौक, रेल्वे स्थानक अथवा बस स्थानक परिसरात राहतात. तसेच राहण्यायोग्य घर नसल्याने रस्त्यावरच आपले जीवन कंठतात. अशा बेघर नागरिकांसोबतच निरांधारांना खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्यात येत आहे.  दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे शहर प्रकल्प अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी आहे.
 
विविध तपशीलांचे संकलन!
सर्वेक्षणात बेघर/ निराधारांचा  सर्वसाधारण तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती संदर्भात तपशील गोळा केल्या जाईल. खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार असून २५ आणि २६ जून रोजी रात्रंदिवस हे सर्वेक्षण होईल.

 
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत बेघर आणि निराधारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तसेच बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- राजेश झनके
शहर अभियान, व्यवस्थापक
दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय उपजिविका अभियान, खामगाव.

Web Title: Two-day survey of homeless people in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.