चिखलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनच्या ट्रकने घेतला पेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:36 PM2018-05-15T14:36:55+5:302018-05-15T14:36:55+5:30

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

truck burnt on highway near chikhali | चिखलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनच्या ट्रकने घेतला पेट 

चिखलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनच्या ट्रकने घेतला पेट 

Next
ठळक मुद्देघटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच खामगाव, नांदुरा येथून अग्नीशमन विभागाने धाव घेतली. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान साधून उडी घेतली.

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
सध्या पश्चिम विदर्भात तापमानाने कळस गाठला आहे. गेल्या पंधरादिवसापूर्वी नांदुरानजिक मालवाहू ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली होती. अशाचप्रकारची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन  ते चार किलोमिटर वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच खामगाव, नांदुरा येथून अग्नीशमन विभागाने धाव घेतली. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता. या घटनेत व्यापाऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. धावता ट्रक पेटल्याने महामार्गावरील वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान साधून उडी घेतली. त्यामुळे तो बचावला.

Web Title: truck burnt on highway near chikhali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.