Video - सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:44 PM2019-03-24T15:44:17+5:302019-03-24T17:11:22+5:30

आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला.

tribal festival salaiban khamgaon | Video - सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव!

Video - सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव!

Next
ठळक मुद्देआदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला.महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला.ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून ९ आदिवासी- वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

अनिल गवई

खामगाव - आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून ९ आदिवासी-वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार, बिरसा मुंडा मंडळ, नेताजी नवयुवक दल, सामाजिक वन परिक्षेत्र जळगाव जामोद आणि तरुणाई फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे रविवारी भव्य फगवा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी-वनवासी बांधवांसोबतच मध्यप्रदेशातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह सहभागी झाले. यात ९ आदिवासी-वनवासी चमूंचा सहभाग होता.

महाराष्ट्रातील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या गावातील आदिवासी चमू सोबतच मध्यप्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील चमू ढोल, ढोलकी आणि ‘माडंल’ घेवून फगवा महोत्सवात सहभागी झाले. यावेळी सह. आयुक्त टी. जी. पाचारणे (जीएसटी, अमरावती),उपवनसंरक्षक संजय माळी, एस. जी. खान, जी. प. सदस्या रुपाली काळपांडे, सुनगावच्या सरपंच विजयाताई पाटील, जळगाव पंचायत समिती सभापती गीताताई बोन्डल ,पाणी फाऊंडेशनचे जिल्हा ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार, पप्पू सेठ अग्रवाल,  अमरावती विद्यापीठाचे अमरावती विभागाचे रासेयोचे समन्वयक प्रा. राजेश मिरगे, ऋषिकेश ढोले,  तरुणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, संस्थापक मनजीतसिंग सिख यांची यावेळी उपस्थिती होती. संचालन उमाकांत कांडेकर यांनी केले. आभार राजेंद्र कोल्हे यांनी केले. 

आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

सातपुड्याच्या पर्वत रांगेत रंगलेल्या फगवा महोत्सवात आदिवासी  संस्कृतीचे  दर्शन घडले. यावेळी आदिवासी बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे आपल्या पारंपारिक पध्दतीने स्वागत केले. वृक्षपूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पाणी फाउंडेशनची कार्यशाळा!

पाणलोट विकास कार्यक्रमातर्गत पाणी फाउंडेशनची कार्यशाळा सलाईबन येथे पार पडली. यावेळी पाणी फाउंडेशनने सादर केलेले विविध मॉडेल अनेकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरले. 

 

Web Title: tribal festival salaiban khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.